|सहकारनामा|
दौंड : दौंड तालुक्यातील यवत येथे प्रतिभा फाउंडेशनच्या वतीने आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते तालुक्यातील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला. या ‛कोरोना योद्धा’ पुरस्कार सोहळ्याच्यावेळी आशा सेविकांंनी सांगितलेले अनुभव हे अंगावर शहारे आणणारे आणि विचार करायला भाग पाडनारे होते.
कोरोना काळात फिल्डवर काम करत असताना आशा सेविकांनी आपला अनुभव कथन करताना आम्ही फिल्डवर गेलो असताना लोकांच्या मनात जी कोरोनाची भीती होती आणि त्यातून ज्या अफवा पसरत होत्या त्यामुळे फिल्डवर काम करताना लोक शिव्या देत होते, कुणी हाकलून देत होते तर एक ठिकाणी खुद्द ग्रामपंचायत सदस्यांनीच हाकलून देत आमच्या विभागातून चालते व्हा असा दमच दिला असल्याचा भयंकर अनुभव कथन केला आणि थोडावेळ सर्वजण स्तब्ध होऊन आशा सेविकांच्यावर होणाऱ्या अन्यायाबाबत विचार करू लागले.
(येथे क्लिक करून व्हिडीओ पहा)
इतक्या भयानक परिस्थितीतही आशा सेविकांनी आपले काम चोख बजावले. मात्र तरीही आशा सेविकांना मिळणारे मानधन हे वाढले नाही ते वाढावे अशी मागणी यावेळी आशा सेविकांनी केली.
आशा सेविकांना आलेला अनुभव हा त्यांनी कथन करताना आरोग्य मंत्र्यांसमोर आम्हाला आमच्या व्यथा मांडण्याची संधी मिळावी यासाठी मंत्री महोदयांनी समोर बोलू द्यावे अशी विनंती केली होती.
मात्र वेळेअभावी त्यांनी आपले निवेदन कागदावर लिहून आरोग्यमंत्र्यांना दिले त्यावेळी आशा सेविकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून येत होते.