|सहकारनामा|
पुणे : आशा सेविका गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्यात यावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादीच्या सरचिटणीस वैशालीताई नागवडे तसेच आशा सेविका यांनी मागणी केली होती, त्यांची हि मागणी ग्राह्य धरत महाराष्ट्र शासनाकडून मंत्रिमंडळ बैठकीत आशा ताई व गटप्रवर्तक यांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला.
यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठी मदत केल्याने आज दि.28 ऑगस्ट रोजी आशा सेविकांच्या पथकाने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.
यावेळी महाराष्ट्र प्रदेश महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सरचिटणीस वैशालीताई नागवडे, दौंड पंचायत समिती सभापती हेमलताताई फडके, माजी सभापती मीनाताई धायगुडे, दौंड तालुका राष्ट्रवादी युवक अध्यक्ष विकास खळदकर सहजपूरच्या सरपंच स्वातीताई होले या आवर्जून उपस्थित होत्या.