Categories: मुंबई

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबीच्या (NCB) तपास पथकाचा महत्वपूर्ण निष्कर्ष

मुंबई : बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खान याचा  मुलगा आर्यन खान बाबत मोठी बातमी समोर येत आहे. आर्यन खान हा अमली पदार्थांच्या मोठ्या कटाचा किंवा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्करी रॅकेटचा भाग होता याचा कोणताही पुरावा नाही असे अमलीपदार्थ नियंत्रण विभाग (NCB) च्या विशेष तपास पथकाचा निष्कर्ष समोर आला आहे.
NCB एनसीबीच्या मुंबई विभागाने केलेल्या आरोपांच्या विरोधात एसआयटीचे SIT चे महत्त्वाचे निष्कर्ष समोर आले असून यात आर्यन खानकडे ड्रग्ज आढळलेच नव्हते त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याचे चॅट्स तपासण्याची गरज नव्हती. चॅट्स असे सुचवत नाहीत की आर्यन कोणत्याही आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा भाग होता असे निष्कर्षात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे एनसीबी च्या गाईडलाईन मध्ये छाप्याचा व्हिडिओ रेकॉर्ड करणे गरजेचे असताना त्या छापेमारीचा व्हिडीओ रेकॉर्डच करण्यात आलेला नव्हता आणि गुन्ह्यात अटक केलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज हे सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले असे निष्कर्ष एनसीबीच्या एसआयटीने काढले आहेत.
एसआयटीचा तपास अद्याप पूर्ण झालेला नसून एनसीबीचे महासंचालक एस. एन. प्रधान यांना अंतिम अहवाल सादर करण्यासाठी आणखी काही महिने लागू शकतात. हा अंतिम अहवाल सादर करण्यापूर्वी कायदेशीर मतं घेतली जातील. विशेषत: आर्यन खानकडे कोणतेही ड्रग्ज आढळले नसतानाही ड्रग्ज सेवनासाठी शिक्षा होऊ शकते का या पैलूवर कायदेशीर मतं घेतली जातील अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मात्र एसआयटीच्या तपासाने छापेमारी आणि एनसीबीचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केलेल्या कारवाईवर आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत. एसआयटीने अनेकदा वानखेडे यांचीसुद्धा चौकशी केली आहे. आर्यनने त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितलं नव्हतं, असंही एसआयटीच्या चौकशीतून स्पष्ट झालं आहे.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago