केडगाव ग्रामपंचायतीमध्ये सरपंच आणि सदस्यांमध्ये वाद उफळला! 1 कोटी 49 लाख रुपये निधी पडून मात्र तरीही कामांची वर्क ऑर्डर नाही, गट विकास अधिकाऱ्यांकडे सदस्यांची लेखी तक्रार

दौंड : केडगाव ग्रामपंचायतीच्या विकासकामांच्या निधीवरून सरपंच आणि सदस्यांमध्ये वाद उफाळून आला आहे. याबाबत केडगाव ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी गट विकास अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली आहे.

तक्रार करणाऱ्या दिलीप हंडाळ, संताजी शेळके, नितीन जगताप, नितीन कुतवळ या ग्रामपंचायत सदस्यांनी दिलेल्या माहितीनुसार, 14 व 15 व्या वित्तआयोगामधील 24 ठिकाणच्या कामाच्या निवीदा केडगाव ग्रामपंचायतकडून वृत्तप्रत्रात प्रसिध्द करण्यात आल्या होत्या. निवीदा मागवून सरपंच व ग्रामविकास अधिकारी यांनी मिटींग बोलावून काही सदस्यांच्या उपस्थीतीत निवीदा ओपन केल्या परंतू सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांनी दिनांक 7/11/2022 मासीक मिटींगपर्यंत वर्क ऑर्डर दिल्या नव्हत्या त्या विषयावर दिनांक 7/11/2022 चा मासीक मिटींगमध्ये चर्चा झाली त्यानुसार उपस्थीत असणाऱ्या सदस्यामध्ये मतदान घेवून 8 सदस्यांनी वर्कऑर्डर देण्यात यावी म्हणुन ठरावाच्या बाजूने मतदान केले व 4 सदस्यांनी वर्क ऑर्डर देऊ नये असे मत मांडले तर 2 सदस्यांनी तटस्थ भुमीका घेतली व 2 सदस्य विषय चालु असतना मिटींग मधून निघून गेले.

या घडामोडीमध्ये 8 विरूध्द 4 अश्या बहूमताने वर्क ऑर्डर देण्यात यावी म्हणून ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर वर्क ऑर्डरबाबत वेळोवेळी ग्रामविकास अधिकारी यांना विचारना केली असता त्यांनी, मी सह्या करून वर्क ऑर्डर तयार केली आहे, परंतू सरपंच सही करत नाही असे सांगितले. त्यामुळे याबाबत सरपंच यांना विचारना केली असता ते उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे त्यांच्या त्यांच्या मरजीतील ठेकेदारांना कामाचे टेंडर मिळाले नाही म्हणून सरपंच वर्कऑर्डर देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप संताजी शेळके यांनी केला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अत्तापर्यंत 14 व्या वित्त आयोगाचे सुमारे 35 लाख 44 हजार व 15 वित्त आयोगाचे 1 कोटी 49 लाख इतकी रक्कम शिल्लक असून सरपंच जानून बूजून आर्थीक तडजोड होत नसल्याने कामाचे वर्क ऑर्डर देत नाही त्यामुळे आपल्या स्तरावर लवकरात लवकर ओपन झालेल्या कामाचे वर्क ऑर्डर देण्यात यावी असा आदेश आपल्या स्तरावर केडगांव ग्रामपंचायत सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना देण्यात यावा अशी विनंती या सदस्यांनी केली आहे.

जिएसटी वाचविण्यासाठी ग्रामपंचायत स्वतः काम करणार – सरपंच अजित शेलार

याबाबत सरपंच अजित शेलार यांना वरील आरोपांबाबत विचारले असता, केडगाव ग्रामपंचायत जिएसटी वाचविण्यासाठी सदर कामे स्वतः करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.