राष्ट्रवादी च्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी इंदापूर येथील अरबाज शेख यांची निवड

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या महाराष्ट्र प्रदेश सचिवपदी (युवक) इंदापूर येथील राष्ट्रवादी काँग्रेस चे अध्यक्ष अरबाज शेख यांची निवड करण्यात आली आहे. अरबाज शेख यांनी या अगोदर इंदापूर येथील युवक राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष म्हणून काम केले आहे.

शरद पवारांच्या विचारांचा वारसा घेवुन अनेक वर्ष पक्ष वाढीसाठी असलेली तळमळ बघता महाराष्ट्र युवक राष्ट्रवादी काँग्रेस चे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष महेबुब शेख यांनी राष्ट्रीय अध्यक्ष धिरज शर्मा व प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशाने त्यांची निवड करण्यात आली आहे.

अरबाज शेख यांचे वडील अनेक वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे सक्रिय कार्यकर्ते म्हणून काम करत होते. त्यांनी इंदापूर शहर अध्यक्ष म्हणून अनेक वर्षे येथे जबाबदारी सांभाळली आहे. यावेळी अरबाज शेख यांनी बोलताना, घरातून राजकीय आणि सामाजिक कामाची आवड निर्माण झाली. त्यातूनच आपण स्वतःला समाजकार्यात झोकून दिले. वरिष्ठ नेत्यांकडून माझी करण्यात आलेली निवड आणि टाकलेला विश्वास आपण सार्थ करून दाखवू असे अरबाज शेख यांनी सांगितले.