APPA LONDHE MURDER CASE : अप्पा लोंढे ‛खून’ प्रकरणातील आरोपीच्या जामीनात वाढ



पुणे : सहकारनामा ऑनलाईन

अनेक जिल्ह्यांमध्ये दरारा आणि प्रस्थ स्थापन केलेल्या अप्पा लोंढे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी विष्णू जाधव यास पुन्हा जामीन वाढवून देण्यात आला आहे.

विष्णू जाधव याच्या वकिलांनी वैद्यकीय कारणास्तव मागे जामीन अर्ज केला होता त्यास त्या कारणास्तव तात्पुरता जामीन मंजूर करण्यात आला होता. त्यावेळी दिलेल्या तात्पुरता जामीनामध्ये विशेष मोक्का न्यायाधीश A.N. सिरसिकर यांनी पुन्हा दोन महिन्यांसाठी वाढ केली आहे.

मागील महिन्यांमध्ये विष्णू जाधव यास वैद्यकीय उपचारासाठी विशेष मोक्का न्यायालयाने एक महिन्याकरिता जामीन मंजूर केला होता. परंतु विष्णू जाधव याच्यामध्ये पुन्हा काही आजारांची लक्षणे आढळून आली त्यावर उपचार होण्यासाठी पुन्हा जामीनाची मुदत वाढवून मिळावी यासाठी त्याचे वकील विजयसिंह ठोंबरे व हितेश सोनार यांच्यामार्फत न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

अर्जाची सुनावणीनंतर न्यायालयाने वैद्यकीय अहवाल आणि आरोपीच्या वकिलांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरत त्याला मिळालेल्या तात्पुरत्या जामीनाची मुदत दोन महिन्यांसाठी वाढवून दिल्याचे आदेश पारित केले.