|सहकारनामा|
दौंड : दहिटणे ता. दौंड येथील तलाठी व खाजगी इसमावर लाच स्वीकारले प्रकरणी आज लाचलुचपत विभागाने कारवाई केली आहे. लाचलुचपत भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम कलम – ७,१२. नुसार हि कारवाई करण्यात आली आहे.
लाचलुचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी आरोपी १)लोकसेवक कुंडलिक नामदेव केंद्रे (वय ३६, पद – तलाठी, सजा – दहिटणे ता. दौंड जिल्हा पुणे)
२) खाजगी इसम, शंकर दत्तु टुले (रा. मिरवडी ता. दौंड) यांनी यातील तक्रारदार यांचे सात बारा भोगवटा वर्ग बदलण्यासाठी आरोपी लोकसेवक यानी ३५,०००/- रूपयांची लाच मागणी करून तडजोडीअंती ३०,०००/- रूपये लाच मागणी केली होती.
याबाबत आज दि.7 जुलै रोजी आरोपी क्रमांक १ व २ यांनी तलाठी कार्यालयात ३०,०००/- रूपये लाच स्वीकारल्यावर त्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले.
यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रीया सरू असून तपास श्री. भारत साळुखे, पोलीस निरीक्षक,
ला.प्र.वि. पुणे युनिट हे करत आहेत.
सदरची कारवाई मा. पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक श्री. राजेश बनसोडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र व मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सुरज गुरव, ला.प्र.वि. पुणे, श्री. सुहास नाडगौडा, अपर पोलीस अधीक्षक, ला.प्र.वि. पुणे यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली आहे.
शासकीय लोकसेवकाने लाचेची मागणी केल्यास त्याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे कार्यालयास खालील नमुद क्रमांकवर सपंर्क साधण्याचे आवाहन श्री. राजेश बनसोडे, पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी केले आहे.