समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात, अपघातात 12 ठार अनेक जखमी

मुंबई : समृद्धी महामार्गावर अपघातांचे सत्र सुरूच आहे. शनिवारी 14 ऑक्टोबर रोजी मध्यरात्री समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात झाला असून या अपघातामध्ये लहान मुले, महिलांसह १२ जण जागीच ठार झाले आहेत. हा अपघात टेम्पो ट्रॅव्हलर आणि रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकमध्ये झाला असल्याची माहिती मिळत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार बुलढाण्यावरून नाशिकला जाणाऱ्या खासगी टेम्पो ट्रॅव्हलरने रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला धडक दिली आणि या अपघातात १२ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात २३ जण जखमी झाले आहेत. या टेम्पो ट्रॅव्हरलमध्ये एकूण ३५ प्रवासी होते.

या टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करणारे सर्व प्रवासी हे नाशिक जिल्ह्यातील असल्याची माहिती मिळाली आहे. हे प्रवासी बुलढाण्यातील बाबा सैलानींच्या दर्शनाला गेले होते. दर्शन घेऊन घरी परतत असताना त्यांच्या वाहनाचा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी स्थानिकांच्या मदतीने मतदकार्य सुरू करण्यात आले. अपघातात जखमी झालेल्या २३ प्रवाशांना छत्रपती संभाजीनगरच्या घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान रस्त्यावर आर टि ओ पोलिसांनी वाहन थांबवून ठेवल्यानंतर या ट्रक ला मागून येणाऱ्या टेम्पो ट्रॅव्हलरने धडक दिल्याचे सांगितले जात आहे. रस्त्यामध्ये आर टी ओ पोलिसांनी वाहन थांबविल्याने हा अपघात झाला असा आरोप यातील जखमीनी केला आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago