आमदार राहुल कुल यांनी खडसावल्यानंतर PMRDA चा आणखी एक भोंगळ कारभार चव्हाट्यावर..

दौंड : (अब्बास शेख) दौंडचे आमदार राहुल कुल यांनी PMRDA चा मनमानी कारभार समोर आणल्यानंतर आता PMRDA चा आणखी एक मनमानीकारक भोंगळ कारभार समोर आला आहे. यामुळे सर्वसामान्य नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून PMRDA चा प्लॅन हा नागरिकांच्या फायद्याऐवजी तोट्याच्याच जास्त असल्याची तक्रार नागरिक करू लागले आहेत.

मिळत असलेल्या माहितीनुसार, PMRDA म्हणजेच Pune Metropolitan Region Development Authority यांनी त्यांच्या दौंड तालुक्यातील अधिपत्याखाली आलेल्या अनेक गावांमध्ये रस्त्यांचा मॅप तयार केले आहेत. मात्र हे रस्त्यांचे मॅप तयार करताना नागरिकांना विश्वासात न घेता थेट नागरिकांच्या सिटीसर्व्हे प्लॉटमध्ये आणि त्यांच्या राहत असलेल्या  घरांच्या मधूनच PMRDA ने रस्ते टाकल्याने मोठा संताप व्यक्त केला जात आहे. ज्या ठिकाणी आजूबाजूला रस्ते आहेत त्या ठिकाणीही PMRDA ने नागरिकांच्या घरांवरून रोड मॅप टाकले आहेत जे अतिशय चुकीचे आहे.

वास्तविक पाहता PMRDA ज्या गावठानांमध्ये रस्ते टाकले आहेत ती गावठाणे १९७० साली सिटीसर्वे होऊन त्याचे नकाशे तयार झाले आहेत आणि त्या नकाशाप्रमाणे त्या त्या गावातील रस्तेही झालेले आहेत मग ते रस्ते सोडून मागणी नसताना आणि गरज नसताना केवळ सुडबुद्धीने एखाद्याच्या थेट सिटीसर्वे प्लॉट मधून हे रोड मॅप का टाकण्यात आले असावेत याचे कोडे अजूनही नागरिकांना उलगडलेले नाही. त्यामुळे PMRDA बने ज्या ज्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने रस्ते टाकले आहेत ते रोड मॅप दुरुस्त करून नागरिकांच्या घरावरून आणि प्लॉटमधून जाणाऱ्या संभ्याव्य रस्त्यांचे मॅप त्वरित हटवावेत अशी मागणी होत आहे.

आमदार राहुल कुल यांनी दाखवला PMRDA ला आरसा – दौंडचे आमदार राहूल कुल यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन मार्च २०२५ मध्ये PMRDA ला आरसा दाखवताना, PMRDA च्या माध्यमातून NA करताना लहान शेतकऱ्यांना मोठ्या अडचणी येत असल्याचे सांगून अनेक शेतकऱ्यांना छोट्या जमिनी NA करण्यासाठी येणाऱ्या अडचणी मधून मार्ग काढावा, PMRDA च्या माध्यमातून नागरिकीकरणाची चांगली व्यवस्था व्हावी असे अपेक्षित होते. परंतु ग्रामीण भागातील शेतकऱ्यांवर G1 व G2 हे झोन लादले गेले त्याचा कोणताही फायदा शेतकऱ्यांना झाला नाही, G2 मध्ये शेतकऱ्यांवर अन्याय झाला. झोन टाकताना कोणतीही समानता नाही. नियोजन शून्य कामकाज झाले आहे. PMRDA ने मनमानी कारभार केला आहे. त्यामुळे PMRDAचा फेरविचार करावा अशी मागणी करत त्यांना खडसावले होते.