डॉ.‘डी.के गोसावी’ स्मृती पुरस्काराची घोषणा, मुंबईच्या ‘कोकिलाबेन हॉस्पिटल’चे डॉ. राजेश मिस्त्री यंदाचे मानकरी

सुधीर गोखले

सांगली : कर्करोगासारख्या जटिल रोगावर उपचार करणारे पश्चिम महाराष्ट्रातील पहिले सेवाभावी रुग्णालय असा नावलौकिक मिळवणारे आणि आतापर्यंत हजारो गरीब कर्करोग पीडित रुग्णांवर यशस्वी उपचार करणारे रुग्णालय म्हणून मिरज येथील श्री. सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटलकडे पाहिले जाते. कै. डॉ. डी. के गोसावी यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने रुग्णालय प्रशासनाकडून गेल्या २० वर्षांपासून कर्करोगावरील यशस्वी निदान आणि उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना डॉ. डी.के गोसावी मेमोरियल ओरेशन पुरस्कार देण्यात येतो. यावेळी हा पुरस्कार मुंबई स्थित ‘कोकिलाबेन हॉस्पिटल’चे डॉ. राजेश मिस्त्री यांना देण्यात येणार आहे.

मिरजेतील तत्कालीन कान, नाक, घशाचे जेष्ठ धन्वंतरी कै. डॉ. डी.के गोसावी आणि कै. डॉ. प्रभा गोसावी यांनी संजीवन मेडिकल फौंन्डेशनच्या माध्यमातून अत्यंत कष्टातून सन १९९७ साली सांगली-मिरज रस्त्यावर या कर्करोगावर उपचार करणाऱ्या रुग्णालयाची उभारणी केली होती. आज त्यांनी लावलेल्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालाय. कै. डॉ. गोसावी यांनी मुंबई च्या टाटा मेमोरियल रुग्णालय आणि रोटरी क्लब यांच्या सहकार्याने हे रोपटे लावले आणि या सगळ्यांना मोलाची साथ दिली. मुंबईच्याच श्री.सिद्धिविनायक मंदिर न्यास ने. आज हजारो कर्करोग ग्रस्त रुग्णांवर या रुग्णालयात माफक दरात उपचार होतात. सर्व प्रकारच्या कर्करोगांचे निदान आणि उपचार या ठिकाणी होत असल्याने या रुग्णालयाला आज वाढती मागणी आहे.

कै. डॉ. डी. के गोसावी यांच्या स्मृतींना उजाळा देण्याच्या हेतूने रुग्णालय प्रशासनाने साधारण २० वर्षांपासून कै. डॉ. डी. के गोसावी यांच्या स्मरणार्थ कर्करोगावरील यशस्वी निदान आणि उपचार करणाऱ्या तज्ज्ञ डॉक्टरांना डॉ. डी.के गोसावी मेमोरियल ओरेशन पुरस्कार देण्याचे निश्चित केले. त्यादृष्टीने आजपर्यंत देश विदेशातील अनेक नामवंत तज्ज्ञ डॉक्टर्सना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावर्षीही हा पुरस्कार ३ डिसेंबर २०२३ रोजी प्रदान करण्यात येणार असून या पुरस्कारासाठी कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल, मुंबई येथील ओंकॉलॉजि विभागाचे संचालक मा. डॉ. राजेश मिस्त्री यांची निवड करण्यात आली आहे.

सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांच्या हस्ते हे वितरण होईल अशी माहिती रुग्णालय व्यवस्थापनाच्या वतीने श्री. तेरदाळ यांनी दिली आहे. या कार्यक्रमात ओकोलॉजी या विषयावर एक चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून यामध्ये डॉ. मिस्त्री मार्गदर्शन करतील अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

12 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago