दौंड : दौंड शहरातून जाणारा मनमाड- बेळगाव राष्ट्रीय महामार्ग (160) नगरपालिकेच्या अण्णाभाऊ साठे उद्यानाच्या संरक्षण भिंतीला लागूनच करण्यात आला आहे. राजकीय षडयंत्रणा मुळे सदरच्या रस्त्याचे काम अत्यंत चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याने उद्यानामध्ये येणाऱ्यांसाठी तो असुरक्षित झालेला आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृति संस्थेने केलेल्या मागणी प्रमाणे रस्ता कामाची दुरुस्ती केली गेली नाही तर मा. मंत्री लक्ष्मणराव ढोबळे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेच्या वतीने जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. संस्थेच्या वतीने नगरपालिका प्रशासनास आंदोलनाबाबत चे निवेदन देण्यात आले, निवेदनामध्ये असे नमूद केले आहे की,
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महा मंडळाने पोलीस बळाचा वापर करीत सदर रस्त्याचे काम पूर्णपणे चुकीचे केले आहे. नागरिकांना सुरक्षितपणे उद्यानामध्ये येण्यासाठी आवश्यक असणारी जागाही रस्ता करताना ठेवण्यात आलेली नाही, या मुळे संस्थेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. याची दखल घेत जिल्हाधिकारी यांनी त्रयस्थ समिती नेमली, त्यांच्या तपासणी नुसार एक मार्गिका उद्याना समोरील रस्त्यापलीकडे घेण्यास हरकत नाही असा अहवाल समितीकडून जिल्हाधिकारी यांना प्राप्त आहे. नगरपालिकेने उद्याना समोरील 100 मी. अंतरातील अतिक्रमण काढून द्यावे म्हणजे उद्यानाच्या बाजूने नागरिकांना उद्यानामध्ये सुरक्षित जाण्याकरिता तसेच पार्किंग साठी जागा उपलब्ध करून देता येईल असे पत्र रस्ते महामंडळाने नगरपालिकेला दिले आहे. मात्र नगरपालिकेने अध्याप याची दखल घेतलेली नाही. संस्थेच्या मागणीप्रमाणे सदर रस्ता कामाबाबत कार्यवाही न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतेवेळी लक्ष्मणराव ढोबळे, आबा वाघमारे,विनायक मोरे’ साठे, सोमनाथ आगलावे,सुधीर वाघमारे,, नाथाबा खंडाळे,रवींद्र सकट, जोगदंड,विनायक माने आदि उपस्थित होते.
Home Previos News दौंड मधील अण्णाभाऊ साठे उद्यान रस्ता प्रकरण चिघळण्याची चिन्हे!लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मृति...