अख्तर काझी
दौंड : साहित्यातून वंचितांचे आयुष्य समर्थपणे उभा करणारे महान साहित्यिक, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती शहरामध्ये मोठ्या उत्साहात व जल्लोषात साजरी करण्यात आली. शहरातील विविध संघटनांकडून सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले.
साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती( साठे नगर) ,लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे स्मृती संस्था तसेच दौंड नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने येथील अण्णाभाऊ साठे उद्यानामध्ये जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी शहरातील विविध पक्ष व संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दौंड नगर परिषदेचे मुख्याधिकारी अवधूत तावडे, आप्पासो पवार ,वासुदेव काळे, नंदू पवार ,फिलिप अंथोनी ,नागसेन धेंडे ,बी. वाय. जगताप, विक्रम पवार, राजू बारवकर, अमोल काळे, सचिन गायकवाड, नरेश डाळिंबे आदि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या भाषणातून अण्णाभाऊ साठे यांच्या महान कार्याचा आढावा घेतला. आबासो वाघमारे, पांडुरंग गडेकर, महादेव ससाणे, मयूर तूपसौंदर्य, सोमनाथ आगलावे ,उपेश तुपसौंदर्य, विनायक मोरे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले.
न्यू महाराष्ट्र पॅंथर सेनेच्या वतीने व जयदीप बगाडे यांच्या पुढाकाराने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकामध्ये सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल शहा यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या पुस्तकांचे वाटप करण्यात आले. यावेळी राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक पाच चे सहाय्यक समादेशक डहाळे उपस्थित होते.
लहुजी शक्ती सेनेच्या वतीने येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये व उपजिल्हा रुग्णालयामध्ये अन्नदानाचा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया, वासुदेव काळे ,स्वप्नील शहा यांनी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. धीरज दिवटे, अमित मोरे, साहिल खंडाळे ,सचिन सोनवणे ,किरण खुडे यांनी आयोजन केले.
डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीने व तालुका अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने जयंती निमित्ताने कुरकुंभ येथील अविश्री बाल सदन मधील विद्यार्थ्यांना गणवेश तसेच महिलांना साडी वाटप करण्यात आले. त्याचप्रमाणे संविधान चौकामध्ये सिद्धांत म्युझिकल नाईट, भीम गीतांचा कार्यक्रम सादर करण्यात आला. सायंकाळच्या सत्रा मध्ये साठे नगर, इंदिरानगर मधील समाज बांधवांच्या वतीने शहरातून अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेची सजविलेल्या रथातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये बहुसंख्येने समाजबांधव सामील होते.