‛सामना’च्या अग्रलेखावरून अण्णा हजारे Anna Hazare शिवसेनेवर आक्रमक, दिला हा ‛इशारा’



राळेगणसिद्धी : सहकारनामा

शिवसेनेचे मुखपत्र असणाऱ्या समानातून अग्रलेख प्रसिद्ध होताच जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे Anna Hazare चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

आम्ही फक्त देशाचा विचार करतो, आम्ही कोणताही पक्ष किंवा त्याच्या नेत्यांचे समर्थन करत नाही तर आम्ही फक्त देश हित आणि समाज हित डोळ्यासमोर ठेऊन काम करत असल्याचे त्यांनी स्पष्ठ केले आहे.

देशात चुकीचे काहीतरी होत असते त्यावेळी आम्ही आंदोलन करतो असे म्हणत तुमच्या मंत्र्यांनी कसा भ्रष्टाचार केला आणि तुम्ही त्यांना कसं पाठीशी घातलं याची सर्व माहिती माझ्याकडे आहे. ती सगळी माहिती  मी देईल असा इशारा त्यांनी राळेगण सिद्धीतून शिवसेनेला दिला आहे.

समानातून आलेल्या अग्रलेखावरून त्यांनी शिवसेनेवर टीका करताना आजचा हा अग्रलेख लिहिण्या मागचा नेमका उद्देश काय आहे ते सांगा? म्हणजे मग मी पण सर्व काही बाहेर काढतो असेही अण्णांनी पुढे म्हटले आहे.

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे Anna Hazare यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर उपोषण करणार असल्याचे जाहीर केले मात्र नंतर ते मागे घेतल्यानंतर सामनामधून त्यांच्या भूमिकेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. अग्रलेखातील या सवलानंतर अण्णांनी (Anna Hazare) आक्रमक होत शिवसेनेवर चौफेर टीका केली आणि  शिवसेनेच्या मंत्र्यांनी भ्रष्टाचार केले असल्याचा आरोप करत ते बाहेर काढण्याचा इशारा देऊन टाकला आहे. 

आंदोलनाबाबत आणि उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांबाबत अण्णांनी उत्तर देताना भाजप सरकारच्या काळात जवळपास सहावेळा आंदोलन केल्याचे तुम्ही विसरलात का? असा प्रतिप्रश्नही केला आहे.