Categories: राजकीय

‘पडवी’ला अनिल शितोळे तर ‘खोपोडी’ला अंबादास शितोळे यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड

दौंड : दौंड तालुक्यातील पडवी आणि खोपोडी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदाच्या निवडणुकीत अनिल शितोळे आणि अंबादास शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे.

पडवी ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठी १० सदस्यामधून अनिल शिवाजी शितोळे यांनी उपसरपंचपदासाठी नामनिर्देशन पत्र दाखल केले होते. त्यांना पडवीचे सरपंच, उपसरपंच यांसह सर्व सदस्यांनी पाठिंबा दर्शविल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी निवडणुक अधिकारी म्हणुन भाऊसाहेब कोळेकर यांनी कामकाज पाहीले. उपसरपंचपदी निवड झाल्यावर गावात जल्लोष करण्यात आला. यावेळी सर्व सदस्य व सरपंच यांना विश्वासात घेऊन पडवी गावचा विकास करण्याचे आश्वासन नवनिर्वाचित उपसरपंच अनिल शितोळे यांनी दिले. यावेळी सरपंच नागेश मोरे, माजी उपसरपंच राजेंद्र शितोळे यांसह सर्व ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

खोपोडी गावच्या उपसरपंचपदी अंबादास शितोळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच वैशाली विजय गरदडे यांच्या अध्यक्षतेखाली ही निवडणूक प्रक्रिया पार पडली. निवडणूक निरीक्षक म्हणून खाडे तर निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी निळकंठ गायकवाड यांनी काम पाहिले. उपसरपंच पदासाठी अंबादास शितोळे यांचा एकमात्र उमेदवारी अर्ज आल्याने त्यांची उपसरपंचपदी बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली. यावेळी सरपंच, सदस्य तसेच ग्रामस्थांनी अंबादास शितोळे यांचे अभिनंदन केले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

13 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago