Categories: Previos News

Anil Deshmukh Parambirsing – स्वतःला वाचविण्यासाठी परमबीर सिंगांनी बिनबुडाचे आरोप केले! मानहाणीचा दावा ठोकणार : गृहमंत्री अनिल देशमुख



मुंबई : सहकारनामा

राज्यातील राजकारण आता नवीन वळण घेताना दिसत आहे. कारण राज्यात एका मागे एक नवनवीन गंभीर प्रकरणे समोर येत असून  अगोदर अंबानी स्फोटके ठेवण्याचे प्रकरण, त्यानंतर मनसुख हिरेन आत्महत्त्या प्रकरण, त्यामध्ये अडकलेले पोलीस अधिकारी वाझे प्रकरण आणि आता राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी लावलेले 100 कोटींच्या वसुलीच्या प्रकरणामुळे राज्य अक्षरशा ढवळून निघाले आहे. 

हे सर्व होत असताना राज्याच्या गृहमंत्र्यांनी मात्र त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले असून परमबिर सिंग यांनी स्वतःला वाचवण्यासाठी तसेच पुढच्या कायदेशीर कारवाई पासून स्वतःचा बचाव करण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे, तसेच या खोट्या आरोपाबाबत आपण त्यांच्यावर मानहाणीचा दावा दाखल करणार असल्याचे एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीने त्यांची प्रतिक्रिया देताना म्हटले आहे.

गृहमंत्र्यांनी सचिन वाझे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात केला होता.

याबाबत अनिल देशमुख यांनी ट्वीट करत परमबीर सिंह यांनी स्वत: चा बचाव करण्यासाठी आणि पुढील कायदेशीर कारवाईपासून स्वतःला वाचवण्यासाठी हा खोटा आरोप केला असल्याचे म्हटले आहे आणि अँटीलिया प्रकरणासह मनसुख हिरेन हत्येमध्ये सचिन वाझे यांचा सहभाग स्पष्ट होत असून तपास तत्कालीन पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांच्यापर्यंत धागेदोरे  पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांनी हे बिनबुडाचे आरोप केल्याचे गृहमंत्र्यांनी म्हटले आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेले पत्र समोर आल्यावर अनिल देशमुख यांनी हे ट्विट केले आहे.  या पत्रात अँटिलिया प्रकरणात सहभागी सचिन वाजे यांचा उल्लेख आहे.  पत्रात राज्याचे गृहराज्यमंत्री अनिल देशमुख यांनी सचिन वाजे यांना दरमहा 100 कोटी रुपये जमा करण्यास सांगितले होते, असा आरोप केला आहे.

परमबीर सिंग यांना नुकतेच मुंबईच्या पोलिस आयुक्तपदावरून काढून टाकण्यात आले आहे.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago