माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ‛अटक’, 11 वाजता न्यायालयात हजर करणार

मुंबई : महाराष्ट्र राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडी कडून अटक करण्यात आली आहे. आज त्यांना 11 वाजता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्यावर परमबीर सिह आणि वाझे यांनी 100 कोटी वसुलीचे टार्गेट देण्यात आल्याचा व पैसे वसुलीचा आरोप केला होता. अटक टळावी म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयापर्यंत धाव घेतली होती मात्र त्यांना दिलासा मिळाला नव्हता.


ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्यानंतर त्यांची सकाळपासूनच ईडीच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली होती. ईडी कडून त्यांना अटक होण्यापूर्वी त्यांनी आपला एक व्हिडिओ प्रसिद्ध करून निवेदन दिले होते आणि त्यामध्ये माझ्यावर आरोप करणारे फरार झाले आहेत, मी मात्र निर्दोष असल्याने समन्स मिळाल्यानंतर ईडी च्या कार्यालयात हजर झालो असल्याचे त्यांनी म्हटले होते.