45 हजार रुग्णांवर उपचार अण 1500 रुग्णांना ‘यमदुताच्या’ तावडीतून सोडविणारा खरा ‘आरोग्यदूत’ | मात्र गौरवशाली कामावर टिका करणारे  ‘सिजनेबल भूत’ – रुग्णांच्या नातेवाईकांचा प्रहार

पुणे : विधानसभा निवडणुका कधीही जाहीर होतील त्यामुळे प्रत्येक इच्छुक आपापल्या पद्धतीने वातावरण निर्मिती करण्यात लागला आहे. मात्र ही वातावरण निर्मिती करताना विरोधकांवर सोडलेले काही टिकात्मक बाण हे बूमरँग होताना दिसत आहेत. असेच काहीसे किस्से दौंड तालुक्यातही घडताना दिसत असून आरोग्यदुतांवर केलेली खालच्या दर्जाची टिका ही रुग्णालयातून घरी आलेल्या सर्वसामान्य माणसाच्या जिव्हारी लागल्याने आता तोही बोलता होऊ लागला आहे. अश्याच काही बोलक्या प्रतिक्रिया यमदूताच्या तावडीतून सुटून आलेल्या रुग्णाच्या नातेवाईकांनी दिलेल्या आहेत.

कधी कामाची घाई गडबड, कधी वेळ रात्रीची तर कधी दिवसाची. अश्यावेळी अचानक फोन वाजतो, समोरून एक व्यक्ती बोलते.. दादा, वडिलांना मेजर अ‍ॅटॅक आला आहे काय करू, एकजण म्हणतो नातेवाईकाचा अपघात झाला आहे, एक म्हणतो भावाला कॅन्सर डिटेक्ट झाला आहे, एक म्हणतो पत्नीची किडनी खराब झाली आहे, एक म्हणतो मुलाच्या मेंदूची अवघड शस्त्रक्रिया करावी लागणार तर एकजण म्हणतो इकडचे डॉक्टर रुग्णालयात घ्यायला तयार नाहीत पुण्याला घेऊन जा म्हणत आहेत काय करू..?

समोरून आवाज येतो रुग्णाला त्वरित मोठ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा, त्या हॉस्पिटलमध्ये दाखल करा, मी डॉक्टरला फोन करतो, बिलाची काळजी करू नका, त्यांना कशी मदत करता येईल ते आपण पाहू पण त्यांचे प्राण कसे वाचतील ते अगोदर पहा.. या सर्व गंभीर प्रकरणांतील संबंधित रुग्णांना मोठ्या रुग्णालयात दाखल केले जाते आणि वेळीच उपचार मिळाल्याने त्यांचे प्राण वाचतात. रुग्ण बरे होऊन आमदारांना भेटायला येतात आणि हात जोडून म्हणतात ‘आरोग्यदुता, तुझे उपकार कसे फेडू..’ यातील रुग्ण वेगवेगळे आहेत मात्र कहाणी सर्वांची एकच आहे. ही कहाणी एक किंवा दोन रुग्णांची नसून हजारो रुग्णांची आहे. आणि प्रत्यक्षात ‘यमदुताच्या’ तावडीत सापडलेल्या व्यक्तीला ‘यमदुताच्या’ तावडीतून वाचवणाऱ्या एका ‘आरोग्यदुत’ आमदाराची ही आहे.

हे आरोग्यदूत आता एका तालुक्यापुरते मर्यादित राहिले नसून त्यांची ख्याती आता संपूर्ण राज्यभर पसरली आहे. त्यांच्या कार्याचा सार्थ अभिमान
दौंड तालुक्यातील नागरिक आणि रुग्णांना तर आहेच आहे मात्र पुणे, अहमदनर, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील लोकांना सुद्धा आता या आरोग्यदुताचा सार्थ अभिमान वाटू लागला आहे.
आरोग्यदूत ही पदवी रुग्ण आणि जनतेकडून  मिळालेले हे आमदार दुसरे तिसरे कोणी नसून दौंडचे विद्यमान ‘आमदार राहुल कुल’ असल्याचे त्यांच्या वरिल कार्यातून आपण ओळखले असेलच. नुसत्या एका जिल्ह्याचे सांगायचे झाले तर पुणे, पिंपरी-चिंचवड, हवेली, पुरंदर, भोर, बारामती, शिरूर, इंदापूर आणि इतर तालुक्यामधील लोकांना त्यांच्या कार्याची प्रचिती तर आलीच आहे.

रुग्णांच्या नातेवाईकांचा संताप – आता निवडणुकांचा सिजन चालू होत आहे त्यामुळे काही सिजनेबल मंडळी आता दहावर्षे आरोग्यनिधीसाठी झगडणाऱ्या आणि ‘यमदुताला माघारी फिरवणाऱ्या ‘या’ ‘आरोग्यदुताला’ राजकीय स्वार्थापोटी घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. सालाबादप्रमाणे पातळीसोडून टिकाही करत आहेत मात्र ज्यावेळी तालुक्यातील आणि तालुक्याबाहेरील लोकांना मदतीची गरज असते त्यावेळी टिका करणारे हे महाभाग नेमक्या कुठल्या बिळात लपून बसलेले असतात हे समजत नाही असा घनाघात रुग्णांचे नातेवाईक, सगे सोयरे करताना दिसत आहेत.

आत्तापर्यंत 45 हजार रुग्णांना मदत करणारा आणि 1500 लोकांना यमदुताच्या तावडीतून सोडवणारा नेता हा आरोग्यदूत म्हणून संबोधला जाईलच मात्र केवळ राजकीय स्वार्थापोटी त्याच्या कार्याला बदनाम करणाऱ्याला मात्र ‘सिजनेबल भूत’ अशी पदवी योग्य राहील अशी टिका रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक करताना दिसत आहेत.