केडगावमध्ये अंगणवाडी सेविकेला 2 महिलांनी लुटले ! 4 लाख 12 हजारांचे सोन्याचे 8 तोळे दागिणे लंपास

दौंड : दौंड तालुक्यातील केडगाव येथे दोन अनोळखी महिलांनी अंगणवाडी सेविकेच्या पर्समधील सुमारे 4 लाख 12 हजारांचे 8 तोळे दागिणे चोरल्याची घटना घडली आहे.

प्राप्त माहितीनुसार, दि.19 एप्रिल रोजी दुपारी 2:15 ते 2:35 दरम्यान अंगणवाडी सेविका राणी राजेंद्र ढवळे (रा.कडेठाण ता.दौंड) ह्या आपल्या पतीसोबत केडगाव (ता.दौंड, जि. पुणे) येथील आदित्य इलेक्ट्रॉनिक्स दुकानामधुन फॅन आणण्यासाठी गेल्या होत्या. त्यावेळी त्यांच्या पर्समध्ये सुमारे 4 लाख 12 हजारांचे 8 तोळे सोन्याचे दागिणे ठेवलेले होते. जे त्यांनी नुकतेच बँकेतून काढून आणले होते. ढवळे ह्या दुकानात फॅन खरेदी करत असताना त्यांच्या पर्समधून त्यांचे 8 तोळे सोन्याचे सर्व दागिणे चोरीला गेले असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी याबाबत दुकानात खरेदी करत असताना त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या दोन अज्ञात महिलांवर संशय व्यक्त केला असून या महिलांची हालचाल संशईत असल्याचे सिसिटीव्ही फुटेजमध्येही दिसत आहे. त्यामुळे राणी ढवळे यांनी या दोन संशईत महिलांवर यवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून यवत चे पोलिस फौजदार, तपासी अंमलदार गाडेकर हे या महिलांचा शोध घेत आहे.

अंगणवाडी सेविका राणी ढवळे यांचा खालील प्रमाणे मुद्देमाल चोरीला गेला आहे.
1)1,65000 रुपयांची साडेतीन तोळयाची मोहनमाळ, 2)1,10,000 रुपयांची दोन तोळयाची गळयातील सोन्याचा चोकर,
3)1,10,000 रुपयांचे दोन तोळे वजनाचे कानातले सोन्याचे वेल व झुबे
4) 27,500२ रुपयांचे एक अर्धा तोळे वजनाचे गळयातील सोन्याचे पदक (डोर्ले) असे 4 लाख 12 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला आहे.