केडगाव (दौंड) : दौंड तालुक्यातील केडगाव येथे अनेक वर्षांपासून फ्लेक्सवर कुरखोड्या करण्याचे सत्र सुरु आहे. कधी राजकीय राजकीय फ्लेक्स फाडले जातात तर कधी धार्मिक फ्लेक्सवर ब्लेड मारले जाण्याचे हे प्रकार अनेक वर्षांपासून सुरूच आहेत. यात आता एका नविन घटनेची भर पडली आहे. ग्रामपंचायत सदस्या कुसुम गजरमल यांचे पुत्र आणि अल्पावधित आपल्या कौशल्याच्या जोरावर मोठे उद्योगपती बनलेले रोहीत गजरमल यांच्या फ्लेक्सवर अज्ञातांनी शेण टाकून आपली जळकी भूमिका पार पाडली आहे.
याबाबत रोहीत गजरमल यांनी बोलताना, आपण सामाजिक बांधिलकी जपत नुकतेच इंदिरानगर, वेताळनगर तसेच अन्य ठिकाणी हायमास्ट दिवे आणि कंपाउंड करून दिले तसेच नवनाथ महाराज मठ (पहाड) जवळ गायकवाड मळा येथे दोन पोल ची कामे केली. ही कामे सुरु असताना अन्यही प्रलंबित कामांना हात घातला असून असेच दोन महत्वाचे प्रलंबित रस्ते, केडगाव भैरोबा मंदिर मुस्लिम आळी, माळी आळी ते योगेश कांबळे घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण करणे, मधुकर गायकवाड घर ते नासिर पठाण, ज्ञानदेव जगताप यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रिटीकरण चे काम आता हाती घेतले आहे. त्यामुळे काहींना सुरु होणारी ही कामे पाहवत नाही हे मला त्यावेळी जाणवले होते.
गावातील हायमास्ट लाईट, कंपाउंड आणि डीपी, पोल टाकण्याचे ही कामे पूर्ण केल्यानेही काहींचा जळफळाट सुरु झाला त्यामुळे आता त्यांनी असे बालिश प्रकार सुरु केले असावेत मात्र अश्या प्रकारांनी आम्ही खचून न जाता उलट यातून ऊर्जा घेऊन आम्ही पुढे जोमाने कामे सुरु ठेऊ असे सांगितले. तसेच कोणत्याही परिस्थितीमध्ये केडगाव गावठाणचा रखडलेला विकास पूर्ण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.