उद्या सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन | युवक, युवतींना सुवर्ण संधी

केडगाव : दौंड तालुक्यातील केडगाव येथे सुभाष बाबुराव कुल महाविद्यालय व महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, विभागीय आयुक्तालय, पुणे पंडित दीनदयाळ उपाध्याय विभागीय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे.

या अनुषंगाने पंचक्रोशीतील महाविद्यालयीन युवक युवतींसाठी नोकरी मिळण्याची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठी जवळजवळ पन्नास कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित राहून या युवकांच्या मुलाखती घेऊन त्यांच्यातील कौशल्य व गुण शोधून त्यांच्या कुवतीप्रमाणे नोकरी देण्याचा प्रयत्न करणार आहे. यासाठी बारावी पास, पदवीधर, आयटीआय शिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असणार आहे. तरी पंचक्रोशीतील विद्यार्थ्यांसाठी ही सुवर्णसंधी असेल.

तरी या संधीचा लाभ घेण्यासाठी युवकांना महाविद्यालयाच्या वतीने आव्हान करण्यात येत आहे. सदर मेळावा सुभाष बाबुराव कुल महाविद्यालयात गुरूवार दि.२८.१२.२०२३ रोजी सकाळी दहा वाजता संपन्न होणार आहे. अशी माहिती संस्थेचे सचिव धनाजी शेळके व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नंदकुमार जाधव यांनी दिली.