पुणे : सहकारनामा (प्रतिनिधी)
“करोना संसर्ग अजुन संपला नाही. आपल्याला अजुन बरीच मजल दर मजल करायची आहे. थकलेल्या मनाला ताजा करुण परत नव्या जोमाने या लढाईत सहभाग घेऊन या महामारी वर मात करू” असा संदेश मुंबईचे प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. हरीश शेट्टी यांनी दिला.
असोसिएशन ऑफ मेडिकल कंसल्टनस पुणे व नोबल हॉस्पिटलच्या संयुक्त विद्यमाने “जिंदगी रिवाइण्ड” कार्यक्रमाचे आयोजन अमनोरा क्लब हाऊस येथे करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष सुधीर मेहता, ए.एम.सी चे अध्यक्ष व नोबल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ.दिलीप माने, कोरोना टास्क फोर्सचे प्रमुख डॉ. डी. बी.कदम यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते.
यावेळी कोव्हीड 19 रोगावर मात केलेल्या डॉकटरांचा सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. डॉ. हरीश शेट्टी सहज आणि सोप्या भाषेत माइंड मूड एंड मैजिक या विषयातून डॉक्टरांचे मनोबल वाढविले.
“आमचे सर्व हॉस्पिटल आणि डॉक्टर असेच कार्यरत राहून लोकानां करोना काळात सेवा अखंड देत राहु” असा विश्वास असोसिएशन ऑफ़ मेडिकल कन्सल्टेंटचे अध्यक्ष डॉ दिलीप माने यांनी दिला.
या कार्यक्रमप्रसंगी नोबल हॉस्पिटलचे कार्यकारी संचालक डॉ. एच साळे, विलु पूनावाला हॉस्पिटलचे डॉ. आर्या, डॉ. किरण शाह, विश्वराज हॉस्पिटलचे डॉ. अदिति कराड, सहयाद्री हॉस्पिटल डॉ. चेतन पांडे,
आणि इतर कोविड केअर हॉस्पिटलचे डॉक्टर उपस्थित होते. या सर्व हॉस्पीटलच्या प्रतिनोधींचा सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन डॉ. रोशनी कावले, डॉ.अभय महिन्द्रे आणि डॉ अर्चना पाटिल यांनी केले. प्रास्ताविक डॉ हिमांशु पेंडसे आणि डॉ. अमर शिंदे यांनी केले.
असोसिएशन ऑफ़ मेडिकल कन्सल्टेंटचे सेक्रेटरी डॉ.चेतन म्हस्के, कोषाध्यक्ष डॉ.साधना धर्माधिकारी, कार्यकारिणी सदस्य डॉ. दीपा पाठक, डॉ. गौतम साळुंखे, डॉ. नागनाथ मस्तुद, डॉ.अनिल लोणकर, डॉ. स्वाती डोळे यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.