दौंड : जो उठतो तो नेत्यांच्या स्टेजवर जाऊन दौंड शहर आपली जागीर असल्याचे भासवायचा प्रयत्न करतो मात्र आता आंबेडकरी युवक या लोकांना त्यांची जागा दाखवून देईल आणि दौंड कुणाची जागीर नाही हे सिद्ध करून दाखवेल असा ईशारा आंबेडकरी युवा नेत्यांकडून देण्यात आला आहे. यावेळी सतिश थोरात, मंगेश चलवादी, सागर जगताप, रोहित कांबळे या युवा नेत्यांनी विद्यमान आमदार राहुल कुल यांना जाहीर पाठिंबा देत त्यांच्या प्राचारासाठी मैदानात उतरले आहेत.
मागील निवडणुकीतील खंत भरून काढण्यासाठी यावेळेस राहुल कुल यांना दौंड शहरातून पाच हजाराचे लीड देऊ असा विश्वास या युवा नेत्यांनी व्यक्त केला आहे. तसेच दौंड शहर व तालुक्यातील आंबेडकरी जनता ही दौंड शहर व तालुक्यातील राहुल कुल यांनी केलेली विकासकामे पाहत आहे. ही विकासकामे आम्ही जनतेमध्ये घेऊन जात असून विकास करणाऱ्या सोबत जनतेने राहून राहूल कूल यांना निवडून देण्याचे आव्हान आंबेडकरी जनतेला करत आहे.
विरोधकांकडे कोणताही ठोस मुद्दा नसल्याने ते जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करत आहेत. आम्ही विरोधकांवर टिका टिप्पनी न करता राहूल कूल यांनी केलेली कामे व पुढील पाच वर्षांमध्ये दौंड शहरातील काया पालट करण्यासाठी राहुल कुल तांच्याकडे असलेले विकास कामांचे व्हिजन या सोबत असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विरोधकांना विकासावर बोलण्या साठी मुद्दे नसल्यामूळे ते प्रत्येकवेळी जाती धर्मावर बोलून तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. आम्ही कोणतीही जात, धर्म व पक्ष न पहाता दौंड शहरातील व तालुक्यातील विकासकामे करणाऱ्याला व सर्वांच्या आरोग्याची काळजी घेणाऱ्याला मत देण्याचे आव्हान जनतेला करत असल्याचे सांगितले.
राहुल कुल यांची विकासकामे आणि त्यांचे कार्य पाहून यावेळी ते किमान पंचवीस हजारांच्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास या चारही युवा नेत्यांनी व्यक्त केला आहे. काहीही झाले तरी यावेळी दौंड शहरातून राहुल कुल यांना लीड राहील असा विश्वास यावेळी सतिश थोरात, मंगेश चलवादी, सागर जगताप, रोहित कांबळे यांनी व्यक्त केला आहे.