पहलगाम मधील अतिरेकी हल्ल्याचा दौंड मध्ये सर्वपक्षीय निषेध

अख्तर काझी

दौंड : जम्मू – काश्मीर मधील पहलगाम येथे आपल्या कुटुंबीयांसोबत पर्यटनासाठी गेलेल्या भारतीय पर्यटकांवर पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला. या हल्ल्यामध्ये अनेक निष्पाप भारतीयांनी आपले प्राण गमाविले. मानवतेला काळीमा फासणाऱ्या या संतापजनक घटनेचा दौंड मधील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांनी तीव्र शब्दात निषेध नोंदविला आहे.

दौंड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये आयोजित केलेल्या सर्वपक्षीय निषेध सभेमध्ये पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आपल्या भाषणातून या घटनेचा तीव्र निषेध नोंदवित, भ्याड हल्ला करणाऱ्या अतिरेक्यांना नेहमीच मदत करणाऱ्या पाकिस्तानचा धिक्कार करण्यात आला. तसेच अतिरेकी हल्ल्यांमध्ये प्राण गमावलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. पर्यटकांवर झालेला अतिरेकी हल्ला पाकिस्तानच्या पाठिंब्यानेच करण्यात आला असल्याने पाकिस्तानला पुन्हा एकदा धडा शिकविण्यासाठी त्यांच्या विरोधात आणखी एक सर्जिकल स्ट्राइक करण्यात यावे अशी प्रतिक्रिया दौंडकरांच्या वतीने व्यक्त करण्यात आली.

माजी नगराध्यक्ष वीरधवल जगदाळे, बादशाह शेख, माजी सभापती आप्पासाहेब पवार, राजेंद्र खटी, राजेंद्र ओझा ,हरेष ओझा, अमित सोनवणे ,मतीन शेख, भारत सरोदे ,सचिन कुलथे, प्रवीण परदेशी, शैलेश पवार, निखिल स्वामी, तजमूल काझी, रतन जाधव, प्रकाश सोनवणे, अशोक जगदाळे तसेच मा. नगरसेवक शहानवाज खान ,अरुणा डहाळे, प्रा.अरुणा मोरे व विविध पक्षाचे संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.