पुणे : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरू असल्याने अता धरणातून नदी पात्रामध्ये पाणी सोडण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
काल दि.11 जुलै रोजी रात्री 11:30 वाजता 1 हजार क्यूसेकने विसर्ग मुठा नदीपात्रात करण्यात आला होता. पावसाचा जोर आणि पाण्याच्या पातळीनुसार विसर्ग कमी किंवा अधिक करण्यात येणार असल्याचे यावेळी प्रशासनाकडून जाहीर करण्यात आले आहे.
याबाबत नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी असे आवाहनहि जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
पावसाचा जोर वाढत असल्याने खडकवासला धरणाच्या सांडव्यातून होत असणारा विसर्ग आज दि.12 जुलै रोजी सकाळी 6 वाजता वाढवण्यात आला असून सध्या 2568 क्युसेकने विसर्ग सुरु आहे. पावसाच्या प्रमाणानुसार विसर्ग पुन्हा कमी किंवा जास्त होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी दक्षता घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.