Categories: पुणे

पुणे जिल्ह्यातील वाढता संसर्ग लक्षात घेता शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर : उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे : पुणे जिल्ह्यातील वाढता संसर्गाचा दर लक्षात घेता शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय पुढील आठवड्याच्या आढाव्यानंतर घेण्यात येईल अशी माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. खेळाडूंची गैरसोय टाळण्यासाठी खेळाडू आणि लशीच्या दोन मात्रा घेतलेल्यांसाठी जलतरण तलाव सुरू करावेत असे निर्देशही त्यांनी आज झालेल्या कोविड परिस्थितीच्या आढावा बैठकीत दिले.

लशीच्या दोन मात्रा घेतलेल्या खेळाडूंसाठी खेळाची मैदानं सुरू करण्याबाबत सूचना देण्यात याव्यात, भीमाशंकर देवस्थानी नागरिकांना दर्शनाची अनुमती द्यावी. लेण्याद्री देवस्थानाबाबत लवकरच निर्णय घेऊ. पर्यटन स्थळांच्या ठिकाणी छोट्या व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय सुरू करण्याची मुभा द्यावी. ज्येष्ठ नागरिकांना लशीची वर्धक मात्रा देण्यासाठी सुविधा उपलब्ध करावी. शनिवार आणि रविवार ज्येष्ठांच्या लसीकरणाला प्राधान्य द्यावं, पुढे महापालिका क्षेत्रात १५ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणाचा वेग वाढवावा. औद्योगिक आस्थापनांनी कामगारांना लशीच्या दोन मात्रा देण्याविषयी सूचना देण्यात याव्या असही त्यांनी यावेळी सांगितले.

शहरी भागात वाढता संसर्ग लक्षात घेता अधिकांशी नागरिक घरीच उपचार घेत असले तरी, कोविड केअर सेंटरमधील यंत्रणा सज्ज ठेवावी. कोविड रुग्णांना उपचारासाठी त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी. खाजगी रुग्णालयांनाही कोविड रुग्णांना दाखल करून उपचार सुविधा देण्याच्या सूचना द्याव्यात, वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर उपलब्ध खाटांच्या योग्य नियोजनाकडे लक्ष द्यावे अशा सूचना यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या बैठकीत केल्या.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

19 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago