Categories: पुणे

‘भीमा पाटस’ कारखान्याबाबत अजित पवारांचे मोठे ‘वक्तव्य’, म्हणाले भीमा पाटस दुप्पट क्षमतेने…

बारामती : दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठे वक्तव्य केले असून भीमा पाटस कारखाना हा शेजारी असणाऱ्या कर्नाटक राज्यातील साखर कारखानदार चालवायला घेत असून त्यामुळे या कारखान्याची गाळप क्षमता दुपटीने वाढणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. ही माहिती देताना त्यांनी जर परराज्यातील व्यवसायिकांनी कारखाने चालवायला घेतले तर कौतुक होते,मात्र राज्यातील लोकांनी चालवायला घेतले तर टिका होते अशी खंतही व्यक्त केली आहे.

भीमा पाटस कारखाना हा दुप्पट गाळप क्षमतेने सुरु होणार असल्याचे या कारखाण्याचे चेअरमन राहुल कूल हे वेळोवेळी सांगत आले आहेत. आमदार राहुल कूल यांनी भीमा पाटस कारखाना पुन्हा जोमाने सुरु करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले असून त्यांच्या प्रयत्नांना आता मोठे यश येताना दिसत आहे. आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा कारखाना दुप्पट क्षमतेने सुरु होणार असल्याचे जाहीर भाषणात सांगितल्याने येथील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार यात आता शंका उरली नाही.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या विस्तारवाढ प्रकल्पाचा शुभारंभ आणि गव्हाण पूजनाचा कार्यक्रमात बोलत होते. सोमेश्वर कारखान्याची वाटचाल योग्य दिशेनं सुरू असून विस्तारवाढ प्रकल्पामुळे भविष्यात सर्व नोंदीत आणि बिगरनोंदीत ऊसाचे गाळप पूर्ण क्षमतेनं होईल, असा विश्वास या कार्यक्रमात त्यांनी व्यक्त केला. श्री सोमेश्वर कारखान्याच्या विस्तारीकरणामुळे प्रतिदिन अडीच हजार मे. टन च्या क्षमतेनं सर्वच्या सर्व ऊस गाळप होईल. यामुळे सभासदांना चांगला फायदा होण्यास मदत होईल. उन्हामुळे ऊस तोडणीला मर्यादा असल्यानं यापुढे हार्वेस्टिंग यंत्राचा वापर करावा लागेल. शेतीसाठी पाणी उपलब्ध असलं तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न प्रथमतः विचारात घेतला पाहिजे. गावं टँकर मुक्त होणं आवश्यक आहे. ऊसाचे क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणण्यासाठी शेतकऱ्यांनी पुढाकार घ्यावा. त्यामुळे पाण्याची बचत होण्यास मदत होईल. शेतकऱ्यांनी पाण्याचा अंदाज घेऊनच ऊसाचं पीक घ्यावं. आज मोठ्या प्रमाणात साखर निर्यात होत असून ही चांगली बाब आहे. मात्र त्यासोबत सभासद शेतकरी आणि साखर कामगारांनादेखील लाभ भेटला पाहिजे.शासनानं साखर कारखान्यांना इथेनॉल, बिसलेरी व ऑक्सिजन निर्मितीसाठी परवानगी दिली आहे.सर्व सहकारी साखर कारखान्यानी याकडे लक्ष देऊन त्याची अंमलबजावणी करावी. सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात १६८ गावं आहेत. या कारखान्याची विस्तारवाढ करताना सर्व सभासदांना संधी उपलब्ध होणं आवश्यक आहे. कारखाना परिसरात सुरू असलेली विकासकामं दर्जेदार होणं आवश्यक आहे असे त्यांनी म्हटले आहे.

भीमा पाटस कारखाना हा दुप्पट गाळप क्षमतेने सुरु होणार असल्याचे या कारखाण्याचे चेअरमन राहुल कूल यांनी वेळोवेळी सांगत आले आहेत. यातच आता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही हा कारखाना दुप्पट क्षमतेने सुरु होणार असल्याचे जाहीर भाषणात सांगितल्याने येथील शेतकऱ्यांना त्याचा मोठा फायदा होणार यात आता शंका उरली नाही.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

5 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

7 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago