Ajit Pawar Rahul Kool उपमुख्यमंत्री ‛अजित पवार’ यांची आमदार ‛राहुल कुल’ यांच्यावर ‛स्तुती सुमने’! सर्वांच्या वतीने मानले आ.कुल यांचे ‛आभार’



|सहकारनामा | अब्बास शेख|

पुणे : पुणे जिल्ह्यात दोन ‛दादा’ (Ajit Pawar, Rahul Kool) आपल्या कार्याने कायमच प्रकाशझोतात राहताना दिसतात.

दोन्ही दादांचा कामाचा वेग हा प्रचंड आहे. एक दादा राज्य पातळीवर आपल्या कामांचा ठसा उमटवत असतात तर दुसरे दादा जिल्हा पातळीवर आपल्या कामाचा ठसा उमटविण्यात आणि लोकांचा विश्वास संपादन करण्यात यशस्वी ठरले आहेत. आता तुम्ही समजलेच असाल की आम्ही कुणाबद्दल बोलतोय, हे दोन्ही ‛दादा’ म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि आमदार राहुल कुल (Rahul Kool) हे आहेत.

कोरोना व्हायरसने आपले उग्ररूप धारण केल्यानंतर दौंडचे आमदार राहुल कुल हे सातत्याने तालुक्यातील प्रत्येक बाबीवर लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्या माध्यमातून तालुक्यात अनेक ठिकाणी शेकडो बेड ची कोविड सेंटर्स सुरू करण्यात आली आहेत.

ते आपल्या सहकाऱ्यांसह दररोज या कोविड सेंटर्सला भेट देऊन रुग्णांची विचारपूस करतात, कुणाला कोणत्या गोष्टीची कमतरता तर नाही ना याची डॉक्टर आणि रुग्णांकडून आवर्जून माहिती घेतात. 

कोविड सेंटर मध्ये वाढ आणि योग्य नियोजन हे सर्व उपक्रम राबविल्याने दौंड तालुक्यात कोरोना महामारी आता आटोक्यात येताना दिसत आहे. या कोविड सेंटर्समध्ये नुसते गरीबच नाही तर अनेक प्रतिष्ठित व्यक्तीही आवर्जून इलाजासाठी भरती होतात हे यामागील यशाचे खरे गमक आहे. आमदार राहुल कुल यांच्या या कार्याची दखल घेऊन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनीही आमदार राहुल कुल (Rahul Kool) यांच्या कार्याची स्तुती केली असून त्यांनी आ.कुल यांच्या या प्रामाणिक कार्याबद्दल आणि जनतेच्या आस्थेबद्दल त्यांचे आभार मानले आहेत.

राज्याचे विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आमदार राहुल कुल यांच्या कार्याबद्दल गौरोवोद्गार काढताना राहुल कुल हे एक कष्टाळू आणि प्रामाणिकपणे जनतेची सेवा करणारे आणि ज्यांना काम समजते आणि ते कसे करावे हे ज्यांना माहीत असते असे आमदार आहेत आणि त्यांच्या कार्याचे कौतुक करावे तितके थोडेच आहे असे म्हटले आहे.

तालुक्यात कोरोना महामारी झपाट्याने वाढत असताना तिला पायबंद घालून गोरगरीब आणि सर्वच स्तरातील लोकांसाठी संपूर्ण तालुक्यात अनेक कोविड सेंटर उभारून आणि आपल्या आणि आपल्या सहकाऱ्यांच्या मार्फत दिवसरात्र प्रत्येक बाबीवर लक्ष ठेऊन जी मदत आमदार राहुल कुल यांनी जनतेला केली आहे ती कधीच विसरता येणार नाही हे मात्र कुणीच नाकारू शकत नाही.