अजित पवार गटाला 9 जागा हव्याच, 6 उमेदवार निश्चित..! अजून या 3 जागांसाठी आग्रही

राजकीय

साधारणता उद्या जाहीर होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अनेक दिवसांपासून महायुती मधील घटकपक्षांमध्ये जागावाटपावरून तनातनीचे वातावरन पहायला मिळत आहे. बैठकीत निघालेल्या तोडग्यावर अजूनतरी तिन्ही पक्षांचे एकमत झाल्याचे दिसत नाही त्यामुळे जागावाटपाची बोलणी लांबली आहे. याच दरम्यान भाजप ३०, राष्ट्रवादी काँग्रेस ७ आणि शिवसेनेच्या वाट्याला ११ जागा येण्याची शक्यता वर्तवली जात होती मात्र अजित पवार हे ९ जागांवर ठाम असून सध्या त्यांच्या ६ जागा निश्चित झाल्याचे बोलले जात आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या गटाला मिळालेल्या सहा जागांमध्ये रायगड – सुनिल तटकरे, बारामती – सुनेत्रा पवार, शिरूर – शिवाजीराव आढळराव पाटील, सातारा – रामराजे नाईक निंबाळकर, धाराशीव – दाजी बिराजदार
परभणी – राजेश विटेकर या सहा जागा निश्चित मानल्या जात आहेत तर
खालील तीन जागांसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आग्रह धरला आहे.
गडचिरोली – धर्मरावबाबा आत्राम, नाशिक – समीर किंवा छगन भुजबळ, बुलढाणा – डॉ. राजेंद्र शिंगणे अश्या एकूण नऊ जागांवर अजित पवार गटाने आग्रह धरला आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या बऱ्याच दिवसांपासून महायुतीमध्ये जागावाटपाची बोलणी सुरु असून वरील फॉर्मुल्यावर तिन्ही पक्षांचे अजूनही एकमत न झाल्याने जागावाटपाचा तिढा तसाच आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना उद्यापर्यंत जागा वाटपाचा तिढा सोडवतील असे सांगितले जात आहे.