बारामती : सहकारनामा
सकाळी लवकर उठून कामांला लागणे ही अजितदादा Ajit Pawar यांची खासीयत आहे. आणि हे सर्वश्रुत आहे. आज दि.31 जानेवारी रोजीही सकाळी लवकर उठून साडेसात वाजता अजितदादांनी जिल्हा बॅंकेच्या जळोची शाखेचं उदघाटन केले.
Video…
आप्पा तुम्ही थोडे अजून काम केले असते तर निवडून आला असता.. अजितदादा पवार
या सर्व प्रकाराबद्दल बोलताना अजित पवार यांनी दौंडचे माजी आमदार आणि जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांची फिरकी घेतली. आणि आप्पा. तुम्हीही लवकर कामाला लागून लोकांची कामे केली असती तर आज तुम्ही निवडून आला असता म्हणजे दौंडचे आमदार झाला असता असं म्हणत अजित पवार यांनी रमेश थोरात यांच्या दौंडमधील झालेल्या पराभवाचं गुपित बोलून दाखवलं.
राज्याचे उप मुख्यमंत्री अजितदादा पवार हे कामप्रति अतिशय तत्पर आणि विकासाच्या दृष्टीने निर्णय घेणारे नेते म्हणून त्यांची संपूर्ण राज्यात ओळख आहे. तसेच ते स्पष्ट वक्ते म्हणूनही प्रसिद्ध आहेत, त्यामुळे ते जे सत्य वाटते ते बोलून दाखवतात आणि त्यांचे बोल हे मोलाचे असतात याबाबत कुणाचे दुमत नाही.