अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. अहमदाबादवरून लंडनला जाणारे एअर इंडियाचे प्रवासी विमान हे टेक ऑफ करताना अहमदाबाद येथील एका रहिवाशी भागात कोसळले आहे. विमान कोसळ्यानंतर सर्वत्र धुराचे लोट दिसत आहेत. प्रवासी विमान असल्याने विमानातील प्रवाश्यांचे काय झाले असेल या विचाराने अनेकांच्या काळजाचा ठोका चुकत आहे.
मिळत असलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथून लंडनला निघालेले विमान हे टेक ऑफ नंतर जवळच्या मेघानी नगर परिसरात कोसळले आहे. या दुर्घटनेमुळे विमानतळाकडे सर्व जाणारे रस्ते बंद करण्यात आले आहेत. मिळत असलेल्या अधिक माहितीनुसार, हे विमान विमानतळाच्या भिंतीला धडकल्यानंतर कोसळले असल्याचे सांगितले जात आहे. विमानातील प्रवाश्यांना वाचविण्यासाठी सध्या युद्धपातळीवर बचावकार्य सुरु असून या भागामध्ये मोठ्या प्रमाणावर फायर ब्रिगेड आणि ॲम्ब्युलन्स गाड्या पोहोचल्या आहेत.