अहमदनगर जिल्हा रुग्णालयात भीषण आग, 7 जणांचा मृत्यू झाल्याची भीती

अहमदनगर : अहमदनगर येथे असलेल्या जिल्हा रुग्णालयाला भीषण आग लागून काही रुग्णांचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात येत असून आगीत होरपळून जवळपास 7 रुग्णांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील आयसीयू विभागात ही आग लागल्याची माहिती हाती येत असून आग आटोक्यात आणण्यासाठी फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी पोहचून त्यांनी शर्थीचे प्रयत्न केले आहेत.
मिळालेल्या वृत्तानुसार या रुग्णालयातील आयसीयू विभागात आग लागली त्यावेळी या वॉर्डात 20 पेक्षा अधिकजण असल्याचे समजत आहे.
आग लागल्याचे समजताच येथील नर्सेस, वॉर्डबॉय आणि डॉक्टरांनी तातडीने रुग्णांना दुसरीकडे शिफ्ट केले त्यामुळे अनेकांचा जीव वाचण्यास मदत झाली आहे.
ही आग नेमकी कशामुळे लागली आहे याबाबत अजून ठोस अशी माहिती समोर आली नाही.
प्रत्यक्षदर्शीनी सांगितल्यानुसार ज्यावेळी रुग्णालयातील आयसीयू विभागामध्ये आग लागली त्यावेळी काही क्षणात ही आग संपूर्ण विभागात पसरली आणि यात जवळपास 7 च्या आसपास रुग्ण दगावले तर 14-15 जण जखमी झाले.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

9 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago