Categories: मुंबई

अग्नितांडव | गोरेगाव येथील इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग, 7 जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई

मुंबईच्या गोरेगाव येथे असणाऱ्या इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग लागून यात सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत 14 जण जखमी झाले असून 30 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आले आहे. आगीचे रौद्ररूप पाहता या आगितील मृतांची संख्या वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आग लागल्याच्या घटनेनंतर अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे.

पहाटे तीन वाजता आगीचे तांडव… मुंबई च्या गोरेगाव पश्चिम भागातील जय भवानी इमारत असून या इमारतीच्या पार्किंग झोनमध्ये ही आग लागली होती. पार्किंग धरून सहा मजल्याची ही इमारत आहे. पहाटे तीन च्या सुमारास आग लागली. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळ गाठून आग विझवण्याचा प्रयत्न केला. या आगीत अडकलेल्या 30 पेक्षा अधिक नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तर 14 जण या आगीमध्ये जखमी झाले आहेत.

जखमींवर या रुग्णालयात उपचार सुरु… आगीत जखमी झालेल्यामध्ये सात महिला आणि सात पुरुषांचा समावेश आहे. जखमींना अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बाहेर काढून मुंबईच्या ट्रॉमा केअर आणि कुपर रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. या आगीत तळमजल्यावर वरील काही दुकाने आणि समोर पार्क असलेल्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत.

Team Sahkarnama

Share
Published by
Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

9 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

3 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे व्यवसाय सुरु करता येणार – सहकारमंत्री

फक्त कर्ज द्या अण वसूल करा इतकेच सहकारी सोसायट्यांचे काम राहिले नाही, आता 151 प्रकारचे…

4 दिवस ago