भयानक स्फोटानंतर ‘जिंदाल’ कंपनीला ‘भीषण आग’

नाशिक : नाशिक येथील जिंदाल कंपनीत भीषण स्फोट होऊन आग लागल्याची घटना घडली आहे. या कंपनीत साधारण 200 ते 300 कामगार काम करत असून आग लागली त्यावेळी शेकडो कामगार आत असल्याची माहिती मिळत आहे. 20 ते 25 गावांना या स्फोटाचे आवाज ऐकू गेले आहेत.

कंपनीत आग लागल्यानंतर आत्तापर्यंत 10 ते 12 जणांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती मिळत आहे. नाशिक च्या इगतपुरी येथे जिंदाल समूहाची हि कंपनी असून तिच्यामध्ये पोलिफिल्मची निर्मित करण्यात येते. केमिकल टॅंक चे स्फोट होऊन हि भीषण आग लागल्याची माहिती पालक मंत्री दादा भुसे यांनी दिली आगे. या आगीत आतापर्यंत किती लोकांचा मृत्यू झाला याबाबत अजून माहिती मिळाली नाही असे पालक मंत्री दादा भुसे यांनी सांगितले आहे.

आग लागल्याची माहिती मिळतच अग्निशमन दल आणि पोलिसांच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे काम सध्या सुरु आहे.