दौंड : श्री स्वामी समर्थ सेवा संघ, दौंड यांच्यावतीने आयोजित गुरुपौर्णिमा महोत्सवाचे औचित्य साधून दौंड बार असोसिएशन चे अध्यक्ष ॲड. प्रशांत गिरमकर यांना विधी क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘समर्थ पुरस्कार’ देऊन गौरवण्यात आले. हा पुरस्कार सोहळा दौंड येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
ॲड. गिरमकर यांनी कायदेशीर क्षेत्रात केलेल्या भरीव कार्याची दखल म्हणून त्यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अनेक वर्षांपासून ते कायदेविषयक सल्ला आणि मदतीच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा संघाने त्यांचा गौरव करण्याचे ठरवले होते.
‘समर्थ पुरस्कार’ मिळाल्याबद्दल ॲड. अमोल काळे यांच्या हस्ते ॲड. प्रशांत गिरमकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ॲड. काळे यांनी ॲड. गिरमकर यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. या सन्मानामुळे ॲड. गिरमकर यांच्या कायदेशीर क्षेत्रातील योगदानाला एक वेगळी ओळख मिळाली असून त्यामुळे इतरांनाही सामाजिक कार्य करण्यासाठी प्रेरणा मिळेल यात शंका नाही.