Categories: देश

राहुल गांधी यांच्या अडचणीत वाढ, शिक्षेविरुद्धची याचिका न्यायालयाने फेटाळली

राहुल गांधी यांना आज पुन्हा एकदा मोठा धक्का बसला आहे. राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात दाखल केलेली याचिका न्यायालयाने फेटाळली आहे त्यामुळे त्यांना कुठलाही दिलासा मिळालेला नाही.

राहुल गांधी यांच्यावर मोदी आडनावाशी संबंधित बदनामी प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली होती. या शिक्षेविरुद्ध राहुल गांधी यांनी गुजरात हायकोर्टात याचिका दाखल केली होती मात्र न्यायालयाने ती याचिका आज फेटाळली आहे.


मोदी आडनावाची बदनामी केल्याप्रकरणी राहुल गांधी यांना सूरत न्यायालयानं दोषी ठरवलं होतं. त्यांना दोषी ठरवून 23 मार्च रोजी दोन वर्षांची शिक्षा नायलायकडून सुनावण्यात आली होती. राहुल गांधी यांची याचिका फेटाळण्यात आल्याने आता ती शिक्षा कायम असणार आहे. त्यामुळे आता राहुल गांधी पुढे काय निर्णय घेतात आणि सर्वोच्च न्यायालयात याबाबत न्याय मागतात का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

20 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago