Categories: Previos News

अभिनेत्री सई ताम्हणकर आणि इतर सिने अभिनेत्यांच्या हस्ते पुण्यात ‛धागासूत्र’ शोरूम चे उदघाटन

सागर बोदगिरे

– संजीत पटवा आणि राज बोकारिया यांच्या अनोख्या ‘धागासूत्र’  या ‘स्टार्टअप’ चे उत्साहात लोकार्पण

पुणे : कपड्यांची खरेदी करत असताना ग्राहक अनेक गोष्टी पडताळून बघत असतात. कपड्याच्या उत्तम क्वालिटी सोबत हव्या तश्या डिझाईन्स ग्राहकांना मिळतीलच याची गॅरंटी नसते. ही उणीव आता पुणेकरांना भासणार नाही कारण, जेंट्स, लेडीज आणि  किड्स वेअर ची खरेदी मनपसंत डिझाईन्ससह शर्टींंग, सुटींग्, डिजायनर, ट्रॅडिशनल, एथनिक वेअर, वेस्टर्न वेअर अशा वैविध्यपूर्ण खरेदीचा आनंद ग्राहकांना ‘धागासूत्र’ च्या कस्टमाईज क्लोथिंग शोरूम मध्ये घेता येणार आहे. संजीत पटवा आणि राज बकोरिया यांच्या अनोख्या  ‘धागासूत्र’  या ‘स्टार्टअप’ चे  लोकार्पण आज मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

याप्रसंगी अभिनेत्री सई ताम्हणकर, अभिनेत्री सई मांजरेकर, अभिनेत्री सोनल चव्हाण आणि अभिनेते रणविजय सिंह यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. ‘धागासूत्र’ हे शोरूम पुण्यात  सेव्हन लव्ह चौक येथे सुरू झाले आहे.

‘धागासूत्र’ बद्दल माहिती देताना संजीत पटवा म्हणाले की, ‘धागासुत्र’ हा एक स्टार्टअप आहे, राज बोकारिया आणि मी याची सुरुवात दोन वर्षांपूर्वी ऑनलाइन पद्धतीने केली आहे, आता आम्ही हे पहिले शोरूम पुण्यात सुरू केलं आहे. सामान्य ग्राहक जर आपल्या मागणी नुसार कॉशुम डिजाईन करून घेत असेल तर ते खूप महाग पडतात. अन् दुकानातील रेडीमेड कपडे घ्यायचे म्हटंले की जसे आहेत तसेच घ्यावे लागतात त्यात आपल्याला काही सुधारणा करता येत नाही.  ग्राहकांची ही अडचण ‘धागासूत्र’ मूळे दूर होणार आहे. आमच्याकडे ग्राहकांना त्यांच्या मागणीनुसार डिझाईन, एम्ब्रॉयडरी, पेंटिंग करून शर्टींंग, सुटींग्, सूट, शेरवानी, कुर्ता, लेडीज वेअर मध्ये ड्रेसेस, गाऊन, लॉन्ग ड्रेसेस, ट्रॅडिशनल, एथनिक वेअर, वेस्टर्न वेअर खरेदी करता येणार आहेत.

पुढे बोलताना संजीत पटवा म्हणाले, ‘धागासूत्र’ हे एक एक्सपिरीयन्स स्टोअर आहे, इथे ग्राहकांना थेट खरेदीला येण्यासोबतच  अपॉईंमेन्ट घेऊन येण्याची सुविधा आहे, यामुळे त्या ग्राहकाला दोन ते अडीच तास आमचे डिझायनर वेळ देऊ शकणार आहेत, या ठिकाणी ग्राहकांना अनुभवी कॉशुम  डिजायनर कडून आपले कपडे डिझाईन करून मिळतील, आमच्याकडे टर्कीश आणि इटालियन फॅब्रीक  मध्ये सर्व व्हारायटी उपलब्ध आहेत. ते ही एकदम वाजवी किंमतीत.  ग्राहकांना त्यांनी ऑर्डर दिल्यानंतर सात दिवसांच्या आत कपडे मिळणार आहेत.

कोविडच्या काळात आम्ही ऑनलाइन माध्यमातून 500 हून अधिक ग्राहकांना कस्टमाईज क्लोथिंगची सेवा पुरवली आहे, आता त्या पुढे जात ही आमची पहिली शोरूम पुण्यात ओपन करताना आनंद होत आहे. हे आमचे पुण्यातील एकमेव शोरूम असणार आहे, भविष्यात ‘धागासुत्र’चा अन्य शहरांमध्ये विस्तार करण्याची आमची योजना असल्याचे राज बकोरिया यांनी सांगितले.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

6 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

8 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

10 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago