Categories: क्राईम

घरामध्ये 2 तलवारी आणि गुप्ती ठेवणाऱ्या दोघांवर कारवाई

अहमदनगर : घरामध्ये तलवारी, गुप्ती आदी शस्त्रे अवैधरित्या ठेवल्याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. नगर शहरातील रेल्वेस्टेशन रोडवरील मातोश्री कॉलनीमध्ये ही कारवाई करण्यात आली आहे. तुषार अर्जुन हरेल (वय २७ वर्षे) अर्जुन विष्णू हरेल (वय ६३ वर्षे) (दोघेही रा. मातोश्री कॉलनी, रेल्वेस्टेशन रोड अहमदनगर) अशी या दोन आरोपींची नावे आहेत.

अधिक माहिती अशी की २ नोव्हेंबर रोजी पोलिसांना गुप्त माहिती मिळाली की, रेल्वे स्टेशन रोडवरील मातोश्री कॉलनीमध्ये आरोपी तुषार व अर्जुन या दोघांनी त्यांच्या घरात अवैधरित्या तलवारी व गुप्ती ठेवल्या आहेत. माहितीच्या आधारे कोतवाली पोलिसांनी तेथे जात छापा टाकला. त्यांच्या घरामध्ये बेडखाली दोन तलवारी व एक गुप्ती आढळून आली. पोलिसांनी आरोपीना ताब्यात घेतले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधिक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कातकाडे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, पोहेकाँ तनविर शेख, पोहेकाँ गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, ए पी इनामदार, पोकाँ अमोल गाढे, संदिप थोरात, कैलास शिरसाठ, सोमनाथ राऊत, राहुल गुंडू आदींच्या पथकाने केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

3 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

5 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

7 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago