गोमांस वाहतूक करणाऱ्यांवर ‘यवत’जवळ कारवाई

दौंड : दौंड तालुक्यातील काुसर्डी टोलनाका येथे गोमांस वाहतूक करणाऱ्या चार जणांवर यवत पोलिसांनी कारवाई केली आहे. यावेळी एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले असून दिनांक 14/04/2023 रोजी पहाटे 05ः40 च्या दरम्याण ही कारवाई करण्यात आली आहे.

फिर्यादी दत्तात्रय सुभाश काळे, (पोलीस नाईक/2242, नेमणुक यवत पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दिनांक 14/04/2023 रोजी पहाटे 05ः40 वा.च्या सुमारास कासुर्डी, (ता. दौंड, जि. पुणे) या गावच्या हद्दीमध्ये असणाऱ्या काुसर्डी टोलनाका येथे 1) मुजफर रंगरेज भाई 2) अन्वर कुरेशी यांनी कसबा (बारामती) येथील कत्तल खान्यामध्ये गाईची कत्तल करून कत्तल केलेल्या गाईचे गोमांस हे कारमध्ये भरून त्यांचेकडे पशुसंवर्धन विभागाचा कोणताही परवाना नसताना वाहतुक करीत असताना मिळून आले. तसेच यावेळी त्यांच्या गाडीच्या सीटखाली धारदार लोखंडी कोयता आढळून आला आहे.

या संपूर्ण प्रकरणात एकूण चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यामध्ये 1) तोषिब अकबर आत्तार, (वय 23 वर्शे, रा. कसबा बारामती, ता. बारामती, जि. पुणे) 2) मुजफर रंगरेज भाई (पुर्ण नाव माहीत नाही) 3) अन्वर कुरेषी (पुर्ण नाव माहीत नाही) (दोन्ही रा. बारामती,जि. पुणे) 4) अफुभाई (पुर्ण नाव माहीत नाही) (रा.कोंढवा पुणे) यांचा समावेश आहे.

वरील सर्व आरोपिंवर महा.प्राणी संरक्षण अधिनियम 1995 चे कमल – 5(क)9(अ)9(ब), भा.द.वि.का.क.34,षस्त्र अधिनियम 1959 – 4, 25 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.