Categories: क्राईम

दौंडमध्ये 7 वाळू माफियांवर कारवाई, 40 लाखांचे जेसीबी, पोकलेन जप्त

अख्तर काझी

दौंड : दौंड तालुक्यातील भीमा नदी पात्रात उच्छाद मांडणाऱ्या वाळूमाफियांनी पुन्हा एकदा सक्रिय होत अवैधरित्या गौण खनिजावर डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केला मात्र दौंड पोलीस व महसूल विभागाच्या पथकाने वेळीच कारवाई करीत त्यांचे कंबरडे मोडले असल्याचे चित्र आहे.

दि.13 जुलै रोजी सायंकाळच्या दरम्यान दौंड हद्दीतील पेडगाव गावच्या भीमा नदी पात्रातील वाळू अड्ड्यावर पथकाने कारवाई करीत महेश उर्फ पप्पू कोथंबिरे संतोष उर्फ बंटी कोथंबीरे (रा. श्रीगोंदा, नगर), असिफ तांडेल, मुक्तार काझी (रा. पेडगाव, श्रीगोंदा), अजित जठार (खोरवडी दौंड), सचिन शेजाळ, शहाजी कापसे (रा. वडगाव दरेकर, दौंड) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती दौंड पोलिसांनी दिली.
दौंड चे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांना खबर मिळाली की तालुक्यातील पेडगाव हद्दीतील भीमा नदी पात्रात वाळूमाफिया अवैधरित्या वाळू उपसा करीत आहेत. त्यांनी लागलीच दौंड चे तहसीलदार अरुण शेलार यांना याबाबत कळविले.

दोन्ही अधिकारी वर्गाच्या मार्गदर्शनाखाली पोलीस व महसूलच्या पथकाने पेडगाव येथील भीमा नदी पात्रात धाड टाकली असता, नदीपात्रामध्ये वाळू माफिया जेसीबी व पोकलेन च्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करीत होते. पथकाची चाहूल लागताच माफियांनी नदीपात्रातून पळ काढला, पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला मात्र ते हाती लागले नाहीत. परंतु त्यांनी नदीपात्रातच सोडून दिलेले जेसीबी व पोकलेन मशीन पोलिसांनी जप्त केले आहेत.

त्याचप्रमाणे माफीयांनी उत्खनन केलेली जवळपास 30 हजार रुपयांची वाळू पुन्हा नदीपात्रात टाकण्यात आली. वाळू माफियांचा 40 लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केल्याने त्यांचे चांगलेच कंबरडे मोडले आहे.
दौंड चे पोलीस उपनिरीक्षक पोपट जाधव,पो. क. राऊत ,बोराडे ,लोहार ,चव्हाण, जाधव, काळे, देवकाते तसेच महसूल विभागाचे प्रकाश भदे ,अनिल मोहिते, संतोष डोले या पथकाने कारवाई केली.

Team Sahkarnama

Recent Posts

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

5 तास ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

7 तास ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

9 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

1 दिवस ago