Categories: क्राईम

थेऊर येथील अनोळखी महिलेच्या खुनाचा लोणी काळभोर पोलीसांनी लावला छडा, आरोपीला 6 दिवसांची पोलीस कोठडी

पुणे /लोणीकाळभोर : लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये दि.०५/०७/२०२२ रोजी चिंतामणी हायस्कुल समोरील मैदानाशेजारी, यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या पडीक जागेत एक २० ते २५ वय असणाऱ्या अनोळखी महिलेचा खून करण्यात आला होता.

या महिलेच्या डोक्यात दगड घालुन तिचा खुन केल्यानंतर तीचा चेहराही विद्रूप करण्यात आला होता त्यामुळे तिची ओळख पटत नव्हती. याबाबत लोणी काळभोर पोलीस ठाणे गु.र.नं.३५४/२०२२ भा.द.वि. कलम ३०२, २०१ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. खून झालेल्या अनोळखी महिलेची कोणत्याही प्रकारची माहिती उपलब्ध नसताना तिची ओळख पटविण्याचे तसेच आरोपीचा शोध घेण्यासाठी मा. नम्रता
पाटील मॅडम, पोलीस उप-आयुक्त परि. ०५, पुणे शहर, मा. बजरंग देसाई, सहा. पोलीस आयुक्त हडपसर विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शन व सुचनांप्रमाणे वपोनि राजेन्द्र मोकाशी यांनी तपास पथकास सुचना देवुन आरोपीचे शोध घेणे बाबत आदेश दिले होते.

पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाचे आधारे नमुद मयत महिला हिचा शोध घेतला असता नमुद मयत महिलेचे नाव वैशाली लाडप्पा दुधवाले, (रा. भिमा कोरेगाव, शिरुर, पुणे व मुळगाव
रा.चिवरी, उमरगा, ता. तुळजापुर, उस्मानाबाद) असे असल्याचे निष्पन्न झाले. मयत महिला हिचेबाबत तिचे नातेवाईकाचा शोध घेवुन त्यांचेकडे अधिक तपास केला असता नमुद मयत महिला हिचे एका इसमासोबत प्रेमसंबंध असल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन पोलीसांनी तपास सुरु केला असता तिचाच प्रियकर महेश पंडित चौगुले, (वय-२४ वर्षे, रा. तळेगाव दाभाडे, पुणे मुळगाव रा.चिवरी, उमरगा, तुळजापुर, उस्मानाबाद) यास तळेगाव दाभाडे, पुणे परिसरातुन ताब्यात घेतले व त्याच्याकडे
अधिक चौकशी केली असता त्यांने प्रथम उडवाउडवीचे उत्तरे दिली परंतु त्यांचेकडे अधिक सखोल तपास केला असता नमुद आरोपी यांने सदरची महिला वैशाली लाडप्पा दुधवाले हिचे सोबत प्रेमसंबंध असल्याचे
सांगुन नमुद मयत महिला वैशाली हिचे चारित्र्याचा संशयावरुन वरील ठिकाणी तिच्या डोक्यात दगड मारुन खुन केला असल्याचे कबुली दिली.

सदर आरोपीस दि.०९/०७/२०२२ रोजी रात्रौ ०१/०० वा अटक करण्यात आली असुन त्याला मा.न्यायालयात हजर केले असता त्यास मा. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी, न्यायालय क्र. ०७, शिवाजीनगर पुणे
०६ दिवसांची पोलीस कस्टडी दिलेली आहे. दाखल गुन्हयाचा पुढील तपास सुभाष काळे पोनि (गुन्हे) हे करीत आहेत. मयत महिला हिची ओळख पटविण्याबाबत पोलीसांनी अनेक प्रयत्न केले होते. परंतु त्यात यश येत नव्हते. सदर गुन्हयात कसलाही धागादोरा नसताना मयत महिला व आरोपी याचा थेऊर परिसराशी कसलाही संबंध नसताना पोलीसांनी कौशल्याने सदर तपास करुन गुन्हा उघडकीस आणुन मयत महिला हिची ओळख पटल्यानंतर तातडीने हालचाल करून काही तासातच गुन्हयाच्या मुळाशी जावुन आरोपीला ताब्यात घेतले आहे.

सदर उल्लेखनिय कामगिरी श्री. अमिताभ गुप्ता, पोलीस आयुक्त, पुणे शहर, श्री. संदिप कर्णिक, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मा. श्री. नामदेव चव्हाण, अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशीक विभाग, पुणे शहर, मा. नम्रता पाटील, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ – ०५, मा. बजरंग देसाई, स. पो. आ. हडपसर विभाग, श्री. राजेन्द्र मोकाशी, वपोनि, सुभाष काळे पोनि (गुन्हे), यांचे मार्गदर्शनाखाली पोउपनि अमित गोरे, पोहवा/नितीन गायकवाड, संतोष होले, आनंद पाटोळे, पोना / श्रीनाथ जाधव, संभाजी देविकर, अमित साळुंखे, पो.शि/ गणेश भापकर, राजेश दराडे, बाजीराव विर, शैलेश कुदळे, निखील पवार, दिपक सोनवणे, मल्हारी ढमढेरे, विश्रांती फणसे यांचे पथकाने केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

18 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago