10 ठिकाणी मोटार सायकली चोरणाऱ्या नानगावच्या 3 सराईत आरोपिंना अटक, यवत पोलिसांची कारवाई

यवत : यवत, दौंड, लोणी काळभोर, हडपसर, बारामती शहर पोलीस स्टेशन हद्दीमधील तब्बल १० मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने गुप्तपणे तपास करत नानगाव येथील तीन सराईत आरोपिंना जेरबंद केले आहे.

दिनांक १५/०६/२०२३ ते दिनांक १६/०६/२०२३ रोजी ०८:०० च्या दरम्यान पाटस (ता. दौड जि. पुणे) या गावच्या हद्दीत कोळपेवस्ती येथून गणेश मल्हारी गडदरे याने गडदरे कॉम्प्लेक्स शेजारी हॅन्डल लॉक करून लावलेली बजाज कंपनीची पल्सर मोटार सायकल कोणीतरी अज्ञात चोरट्याने चोरून नेली होती. याबाबत यवत पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. या गुन्ह्याचा तपास करताना यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेण्यास सुरुवात केली तसेच पाटस परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक केले असता सदरचा गुन्हा कृष्णा रामभाऊ लोंढे (रा.नानगाव ता.दौंड,जि.पुणे) व त्याचे इतर दोन साथीदार यांनी केल्याचे तपासात पुढे आले.

त्यानंतर यवत गुन्हे शोध पथकाने गुप्त बातमीदारामार्फत माहिती घेऊन नानगाव चौक येथून संशयित आरोपी १)कृष्णा रामभाऊ लोंढे (वय २३ वर्षे रा.नानगाव रासकर आळी ता.दौंड, जि.पुणे) २) राहुल उर्फ कोयत्या हिंम्मत पवार (वय २१ वर्षे रा.नानगाव ता दौंड जि पुणे) यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता कृष्णा रामभाऊ लोंढे याने त्याचे इतर साथीदार
राहुल उर्फ कोयत्या हिंम्मत पवार आणि यश उर्फ पंडीत ज्ञानेश्वर थोरात (रा. नानगाव ता.दौंड, जि.पुणे) यांच्या मदतीने यवत, दौंड , लोणी काळभोर, हडपसर, बारामती शहर इत्यादी पोलीस स्टेशन हद्दीतून १० मोटार सायकली चोरल्याचे कबूल केले.

सदर बाबत खालील प्रमाणे गुन्हे दाखल आहेत
१)यवत पोलीस स्टेशन गु. र.नं . ६५०/२०२३ भा. द.वि.कलम ३७९
२)यवत पोलीस स्टेशन गु. र.नं . २७६/२०२३ भा. द.वि.कलम ३७९
३) यवत पोलीस स्टेशन गु. र.नं. ११६७/२०२३ भा. द.वि.कलम ३७९
४)दौंड पोलीस स्टेशन गु. र.नं. ३८/२०२४ भा. द.वि.कलम ३७९
५)लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ५१४/२०२२ भा. द.वि.कलम ३७९
६)लोणी काळभोर पोलीस स्टेशन गु.र.नं. ४७/२०२४ भा. द.वि.कलम ३७९
७)हडपसर पोलीस स्टेशन गु.र.नं. १७८९/२०२३ भा. द.वि.कलम ३७९
असे एकूण १० गुन्हे उघडकीस आले आहेत.

आरोपी कृष्णा रामभाऊ लोंढे याचे कडून ९ मोटार सायकली सह एकूण किंमत रुपये ३,५५,०००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपी कृष्णा रामभाऊ लोंढे याचेवर यापूर्वी खालील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
१) यवत पोलीस स्टेशन गु.र.नं. ५०९/२०२३ भा.द.वि.कलम ३०८,३२७,३४

सदरची कामगिरी यवत पोलीस स्टेशन गुन्हे शोध पथकाने मा.पोलीस अधीक्षक श्री अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक श्री आनंद भोईटे, उपविभागीय पोलीस अधिकारी श्री स्वप्नील जाधव, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री अविनाश शिळीमकर, यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री हेमंत शेडगे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संजय नागरगोजे, पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख,पोलीस हवालदार निलेश कदम,गुरूनाथ गायकवाड, अक्षय यादव,महेंद्र चांदणे, रामदास जगताप,पोलीस नाईक हनुमंत भगत,पोलीस शिपाई समीर भालेराव यांचे पथकाने केली आहे.