Categories: क्राईम

इंदापूर येथील खून प्रकरणातील आरोपिंना अटक, महत्वाची माहिती आली समोर

पुणे : इंदापूर शहरालगतचे बायपास रोडवरील जगदंबा हॉटेल मध्ये झालेल्या खुनाच्या गुन्ह्याचा उलगडा करण्यात पोलिसांना यश आले आहे. हा खून पुर्व वैमन्यस्यातून झाला असल्याची महत्वाची माहिती समोर येत असून अजूनही काही आरोपिंना अटक करणे बाकी आहे. स्थानिक गुन्हे शाखा व इंदापूर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण पोलीसांनी मोठ्या शिताफिने आरोपिंना अटक केली आहे.

Video – आरोपिंना घेऊन जाताना पोलीस

इंदापूर शहरास लागून असलेल्या बायपास हायवे रोडवरील सोलापूरकडे जाणाऱ्या लेनलगत हॉटेल जगदंब येथे दि.१६/०३/२०२४ रोजी रात्री ८ च्या सुमारास अविनाश बाळु धनवे (वय ३१ वर्षे, रा. चन्होली बुरा, वडमुखवाडी,ता. हवेली जि. पुणे) याचा खून करण्यात आला होता. धनवे हा त्याचे मित्र बंटी ऊर्फ प्रणिल मोहन काकडे, राजु एकनाथ धनवडे, राहुल एकनाथ धनवडे यांच्या सोबत जेवण करण्यासाठी थांबलेला होता. जेवणाची ऑर्डर देवून चारही मित्र टेबलवर बसलेले असताना आठ जणांच्या टोळीने हातात पिस्टल, कोयता घेवून येत हॉटेल मध्ये बसलेल्या अविनाश धनवे याच्यावर पिस्टल मधून गोळ्या झाडल्या होत्या तर इतरांनी कोयत्याने त्याच्यावर वार करून त्याला जागीच ठार केले होते. झालेल्या घटनेबाबत अविनाश धनवे याची पत्नी सौ.पुजा अविनाश धनवे हिने इंदापूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिल्याने विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदरचा गुन्हा हा अतिशय गंभीर स्वरूपाचा असल्याने पुणे ग्रामीण जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक, पंकज देशमुखसाहेब, अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव, बारामती विभाग, उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन राठोड, बारामती विभाग, स्वप्निल जाधव, दौंड विभाग यांचेसह स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, पोनि सूर्यकांत कोकणे इंदापूर यांनी घटनास्थळी भेट देतं जागेवरील सीसीटीव्ही फुटेज तपासून व फिर्यादी यांचेकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे सदरचा गुन्हा दोन गुन्हेगार टोळीतील पूर्ववैमन्यसातून झाला असल्याचे निष्पन्न झाले.

खुनाचे प्राथमिक कारण आले समोर..
मयत अविनाश बाळू धनवे याची चऱ्होली, आळंदी परिसरात गुन्हेगारी दहशत होती. तो रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार होता. त्याचे आळंदी परिसरातील स्थानिक गुन्हेगार टोळी सोबत वैमनस्य असल्याने त्याचा खून त्याचे विरोधी टोळीनेच केला असल्याची माहिती प्राप्त झाली. सदर गुन्हयातील आरोपी हे कोल्हापूर कडे पळून जात असल्याची बातमी पोलिसांना मिळताच त्यांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारावर आरोपी १) शिवाजी बाबुराव भेंडेकर, (वय ३५ वर्षे, रा.पद्मावती रोड, साठेनगर, आळंदी देवाची, ता. खेड, जि. पुणे) २) मयुर ऊर्फ बाळा मुकेश पाटोळे (वय २० वर्षे, रा. आंबेडकरचौक, पोलीस चौकी समोर, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे) ३) सतिश ऊर्फ सला उपेंद्र पांडे (वय २० वर्षे, रा. शाळा नं. ४,चन्होली रोड, सोपानजाई पार्क, आळंदी देवाची ता. खेड जि पुणे) ४) सोमनाथ विश्वंभर भत्ते, (वय २२ वर्षे, रा. मरकळ रोड,सोळू, ता. खेड जि.पुणे) यांना पुणे कोल्हापूर हायवे रोडवरील शिंदेवाडी गावचे परिसरातून ताब्यात घेण्यात आले.

ताब्यातघेण्यात आलेल्या आरोपींवर यापुर्वी खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी असे गुन्हे दाखल आहेत. सदर गुन्ह्यातील इतर आरोपींचा शोध सुरु आहे. सदरची कामगिरी पुणे ग्रामिण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक संजयजाधव, बारामती विभाग, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, पुणे विभाग, एस. डी. पी. ओ. भाऊसाहेब ढोले, हवेली विभाग, स्वप्निल जाधव, दौंड विभाग, सुदर्शन राठोड, बारामती विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, इंदापूर पोलीस स्टेशनचे पो. नि. सुर्यकांत कोकणे स्था.गु.शा. चे सपोनि योगेशलंगुटे, कुलदीप संकपाळ, पोसई प्रदीप चौधरी, गणेश जगदाळे, अमित सिदपाटील, पोलीस अंमलदार बाळासाहेब कारंडे, अभिजीत एकशिंगे, स्वप्निल अहीवळे, राजु मोमीण, अतुल डेरे, सचिन घाडगे, अजित भुजबळ, मंगेश थिगळे, अजय धुले, प्रकाश वाघमारे, जनार्दन शेळके, तुषार पंदारे, विक्रम तापकीर, दिपक साबळे, संदीप वारे, बाळासाहेब खडके, राहुल घुबे, निलेशसुपेकर, अक्षय नवले, निलेश शिंदे, काशिनाथ राजापुरे, अक्षय सुपे, दगडू विरकर इंदापूर पोलीस स्टेशनचे सपोनि प्रकाश पवार, पोसई गरड, पोलीस अंमलदार प्रकाश माने, सचिन बोराडे, सलमान खान, नंदू जाधव, विशाल चौधर, अमित यादव, विनोदकाळे, महिला पोहवा माधुरी लडकत यांनी केली आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

15 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक, बंदुकीची 175 तर पिस्तूलाची 40 काडतुस हस्तगत

पुणे ग्रामिण पोलिसांची दमदार कामगिरी | उरुळी कांचन गोळीबार प्रकरणातील आरोपिंना अटक

4 दिवस ago