Categories: क्राईम

दोन ‘पिस्तूल’ विकायला ‘राहू’ मध्ये आला, अण.. थेट पोलिसांशीच ‘सामना’ झाला

दौंड : दौंड तालुक्यातील राहू येथे दोन गावठी पिस्तूल जवळ बाळगून ती विक्री करण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग (LCB) च्या पथकाकडून अटक करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार आरोपी तुषार तात्या काळे (रा.वाळकी ता.दौंड) हा दोन गावठी पिस्तूल विक्री करण्यासाठी राहू (ता.दौंड) येथे येणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेशन विभाग (LCB) ला मिळाली होती. सोमवार दि.9 जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास आरोपी तुषार काळे हा राहू येथील एका हॉटेलजवळ आल्यानंतर त्याच्या मागावर असणाऱ्या पोलिसांशी त्याचा सामना झाला.

यावेळी आरोपीला काही समजायच्या आत पोलिसांनी त्यास ताब्यात घेत त्याची झडती घेतली त्यावेळी त्याकडे दोन गावठी पिस्तूल मिळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपीला यवत पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून तो कुणाला पिस्तूल विकायला आला होता आणि त्याला कुणी पिस्तूल दिले हे पोलीस तपासात पुढे येणार आहे.

Team Sahkarnama

Recent Posts

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

2 तास ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

22 तास ago

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

दौंडमध्ये चिमुकलींचा विनयभंग, 3 उंटवाल्यांना पोक्सो कायद्यान्वये अटक

4 दिवस ago