Categories: Previos News

Accident : दौंडमध्ये कार- ट्रॅक्टरची समोरासमोर धडक, अपघातात सुदैवाने वऱ्हाडी मंडळी बचावली



दौंड : सहकारनामा ऑनलाइन (अख्तर काझी)

शहरातील हॉटेल राजधानी ते उड्डाणपूल (गजानन सोसायटी रोड) या मार्गावर कार व ट्रॅक्टर ची समोरासमोर धडक होऊन अपघाताची घटना घडली आहे. दोन्ही वाहन चालकांनी अपघात बचावासाठी प्रयत्न केले तरीही अपघात टळू शकला नाही. परंतु अपघातात सुदैवाने कोणीही जखमी झाले नाही, कारचे मात्र नुकसान झाले आहे. 

या मार्गावरील रामकृष्ण लॉन्स या कार्यालयामध्ये आज एक लग्नकार्य होते, या लग्नकार्यासाठी बाहेर गावाहून आलेल्या वऱ्हाडी मंडळीची कार उड्डाणपूल दिशेने कार्यालयाकडे येत होती, कार्यालय रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असल्याने कार चालकाने कार कार्यालयाच्या बाजूला वळविली असता हॉटेल राजधानी रस्त्याने येणाऱ्या ट्रॅक्टरने कारला धडक दिली. 

दोन्ही वाहन चालकांना अपघाताचा अंदाज आल्याने त्यांनी आपापल्या परीने वाहनांची धडक होऊ नये म्हणून प्रयत्न केले, परंतु धडक बसलीच, तरीही  दोन्ही वाहनचालकांचा गाडीवरील ताबा सुटला नसल्याने व वाहनांचा वेगही  कमी असल्याने धडक जोरात झाली नाही त्यामुळे मोठा अपघात टळला. 

ट्रॅक्टरच्या धडकेनंतर कार कार्यालयाच्या कंपाउंडला धडकून थांबली. त्यामुळे कार मध्ये असलेले व्हराडी सुखरूप बचावले.

 दोन राज्यांना जोडणाऱ्या बेळगाव -मनमाड राष्ट्रीय  महामार्ग आंतर्गत या रस्त्याचे काम नुकतेच पूर्ण झाले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून भरघाव वेगात वाहनांची वाहतूक सुरू असते.

रस्त्याची रुंदी मोठी आहे परंतु रस्त्यामध्ये दुभाजक नसल्याने याठिकाणी वारंवार अपघात होत आहेत ज्यामुळे येथील दुभाजकांचा प्रश्न ऐरणीवर आहे. काही दिवसापूर्वीच याच रस्त्यावर दुचाकीस्वाराला अज्ञात वाहनाने ठोकर दिल्याने एका युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे तर एक जखमी युवक आजही दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत आहे. 

अशा अपघातामुळे जीव घेणा रस्ता अशी या रस्त्याची ओळख होत आहे तरीही प्रशासनाला जाग येत नाही हे दुर्दैव म्हणावे लागेल.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

11 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago