Categories: Previos News

Accident : केडगाव-वाखारी रोडवर ट्रक-दुचाकीच्या अपघातात दुचाकीस्वार जागीच ठार

दौंड : सहकारनामा ऑनलाइन

दौंड तालुक्यातील केडगाव-वाखारी रोडवर एक मालवाहतूक ट्रक आणि दुचाकीचा अपघात होऊन यात दुचाकीस्वार जागीच ठार झाला आहे तर अपघातानंतर ट्रक चालक ट्रक घटनास्थळी सोडून पळून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार केडगाव-वाखारी रोडवर दुपारी साधारण 2:30 च्या आसपास ट्रक क्र. MP-09 HH 7023 आणि दुचाकी क्र. MH-42 X 4275 यांच्यामध्ये जोरदार धडक झाली.

या धडकेमध्ये दुचाकीस्वार लक्ष्मण शेलार (सध्या रा. उरुळी कांचन) हे जागीच ठार झाले तर ट्रक ड्रायव्हर (नाव समजू शकले नाही) हा घटनास्थळी ट्रक सोडून  पळून गेला आहे.

या अपघाताची माहिती मिळताच केडगाव पोलीस चौकीचे हवालदार सचिन जगताप आणि विशाल गजरे यांनी घटनास्थळी जाऊन अपघातातील वाहने ताब्यात घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी यवत ग्रामीण रुग्णालयात पाठवून दिला.

अपघाताची माहिती मिळताच तेथे गणेश शेळके, संदीप मोरे, किरण जगताप, दीपक शिंदे (पोलीस पाटील वाखारी), राजेंद्र जाधव, व इतर ग्रामस्थांनी मृतदेह उचलण्यास आणि वाहने पोलीस ठाण्यात पोहचविण्यास पोलिसांना विशेष सहकार्य केले.

याबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

14 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago