Accident : यवत जवळ कंटेनर मिनी ट्रॅव्हल्समध्ये भीषण अपघात, ट्रॅव्हलचालक जागीच ठार



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील यवत जवळ पुणे सोलापूर महामार्गावर डिव्हायडर ओलांडून पलीकडे गेलेल्या मिनी ट्रॅव्हल्सने कंटेनरला दिलेल्या जोरदार धडकेत ट्रॅव्हल्सचालक जागीच ठार झाला आहे.

हा अपघात आज रविवार दि.10 जानेवारी रोजी पहाटे 6 वाजण्याच्या आसपास घडला असल्याची माहिती मिळत  असून या अपघातामध्ये मिनी ट्रॅव्हल्स चालक गजानन अगरवाल नावाच्या ड्रायव्हरचा मृत्यू झाला आहे. त्याचा पूर्ण पत्ता मात्र अजून समजू शकलेला नाही.

अपघात घडल्यानंतर कंटेनर मधील लोखंडी सळया ह्या संपूर्ण महामार्गावर येऊन पडल्या होत्या त्यामुळे वाहनांच्या दोन्ही बाजूंनी रांगा लागल्या होत्या. अपघाताची माहिती मिळताच यवतचे पोलीस पोना दौंकडर, पोना खत्री, पीसी सुपेकर, पीसी कापरे यांनी अपघातस्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली तसेच ट्रॅव्हल चालकास त्वरित रुग्णालयात दाखल केले. या अपघाताबाबत यवत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू आहे.