Categories: Previos News

Accident – कराड जवळ अपघातात ठार झालेल्यांमध्ये यवतच्या तरुणाचा समावेश, यवत गावावर शोककळा

पुणे : सहकारनामा

पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आटके टप्पा परिसरात काल सायंकाळी इनोव्हा कार व स्विफ्ट कारचा भीषण अपघात Accident झाला होता. या अपघातामध्ये 3 जण जागीच ठार झाले होते तर 7 ते 8 जण गंभीर जखमी झाले होते.

या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या युवकांमध्ये यवतच्या (ता.दौंड.जि.पुणे) येथील तरुणाचाही समावेश असून या बातमीने संपूर्ण यवत गावववर शोककळा पसरली आहे. राहुल दोरगे (वय २८) असे या तरुणाचे नाव असून एक वर्षभरापूर्वीच त्याचे लग्न झाले होते. 

राहुल हा पुण्यातील एका कंपनीत कामाला होता. तो होतकरू आणि मितभाषी असल्याने त्याचा मोठा मित्र परिवार होता. त्याचे मागे पत्नी, आई, वडील, भाऊ भावजय असा परिवार असून राहुलचे मोठे बंधू नुकतेच यवत ग्रामपंचायतीची निवडणूक जिंकून सदस्य झाले आहेत.

पुणे-बंगळूर महामार्गावर कोल्हापूर बाजूकडुन पुणे बाजूकडे इनोव्हा कार व स्वीफ्ट कार निघाल्या होत्या. त्या दोन्ही कार कराड तालुक्याच्या नारायणवाडी गावच्या हद्दीत आल्यानंतर एकमेकांना ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात अटकेटप्पा येथे त्यांचा अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही कार रस्त्याच्या बाजूल असलेल्या झाडावर जाऊन आदळल्या त्यामध्ये 3 तरुणांचा जागीच मृत्यू झाला त्यामध्ये राहुल याचाही समावेश होता.

Sahkarnama

Recent Posts

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

पीडिसीसी बँकेच्या कायदेशीर सल्लागार पदी अ‍ॅड.फिरोज शेख यांची निवड

15 तास ago

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

खून, दरोडा प्रकरणात 7 वर्षापासून फरार आरोपी जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

1 दिवस ago

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार – मा.नगराध्यक्ष बादशाह शेख

ज्यांच्यासाठी ३४ वर्षे काम केले त्यांनी वाईट काळात वाऱ्यावर सोडले… येणाऱ्या विधानसभेला कुल-थोरातांविरोधात उभा राहणार…

1 दिवस ago

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

दौंड मध्ये हजरत मो.पैगंबर जयंती अभूतपूर्व जल्लोषात साजरी, शहरात हिंदू-मुस्लिम भाईचार्‍याचे अनोखे दर्शन

1 दिवस ago

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

दौंड तालुक्यातील नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी माझी, त्यांच्यासाठी कायम झटत राहील : आ.राहुल कुल

2 दिवस ago