दौंड तहसील कार्यालयामध्ये लाचलूचपत विभाग (ACB) कडून कारवाई, हक्क नोंदणी विभागातील लिपिक लाच घेताना जाळ्यात

अख्तर काझी

दौंड : दौंड तहसील कार्यालयामध्ये आज सायंकाळी लाचलूचपत विभागाकडून कारवाई करण्यात आली असून या कारवाईमध्ये हक्क नोंदणी विभागातील लिपिकास चार हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तुषार शिंदे असे पकडण्यात आलेल्या लिपिकाचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार दौंड तहसील कार्यालयामध्ये हक्क नोंदणी विभागात लिपिकाकडून शासकीय कामासाठी लाच मागण्यात येत असल्याची तक्रार लाचलूचपत (ACB) विभागाला संबंधित तक्रारदाराने केली होती. तक्रारदाराच्या तक्रारीनंतर ACB ने आज सकाळपासूनच दौंड तहसीलमध्ये सापळा रचला होता. सायंकाळी 5 ते 5:30 च्या दरम्यान तक्रारदाराकडून आरोपी लिपिक चार हजारांची लाच घेताना मिळून आला.

लाच घेत असतानाच लाचलूचपत विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्यास रंगेहात पकडत आपल्या ताब्यात घेतले. सध्या दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.