पुणे : आज पुण्यात लाचखोरीचे एक धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. एका वकिलास त्याच्या अशीलाला जामीनात मदत करण्यासाठी पोलीस उपनिरीक्षकाने थेट दोन कोटींची मागणी केली असून यातील 46 लाख 50 हजारांची रक्कम स्विकारताना त्याला एसीबी ने रंगेहात पकडले आहे.

प्रमोद रवींद्र चिंतामणी असे या लाचखोर पोलीस उपनिरीक्षकाचे नाव असून तो आर्थिक गुन्हे शाखा पिंपरी चिंचवड आयुक्तालय येथे कार्यरत होता. या प्रकरणातील तक्रारदार हे व्यवसायाने वकील असून त्यांच्या आशीलाविरुद्ध बावधान पोलीस स्टेशन येथे भा.न्या.सं.कलम 316(2), 316(5), 318(4), 336(2), 338,339, 3(6) प्रमाणे गुन्हा दाखल आहे. त्या गुन्ह्यामध्ये आशिलाच्या वडिलांना सुद्धा अटक झाली असून ते सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. सदर गुन्ह्याचा तपास आर्थिक गुन्हे पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालय येथील पोलीस उपनिरीक्षक प्रमोद चिंतामणी याच्याकडे होता.
सदर गुन्ह्यामध्ये तक्रारदारांच्या आशीलाला मदत करण्यासाठी व आशिलाच्या वडिलांच्या जामीन अर्जावर ‘से’ (म्हणजे आपले म्हणणे) दाखल करण्यासाठी यातील आरोपी लोकसेवक प्रमोद चिंतामणी (पोलीस उपनिरीक्षक) याने तक्रारदाराकडे स्वतःसाठी 2 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. तशी तक्रार तक्रारदाराने लाच-लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे दिली होती.
यातील तक्रारदाराने दिलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने दिनांक 27/10/2025 रोजी ला.प्र.वि.पुणे विभागाकडून ट्रॅप लावण्यात येउन लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता पडताळणीमध्ये आरोपी लोकसेवक (आलोसे) याने तक्रारदार यांना त्यांच्या अशीलाला गुन्ह्यात मदत करण्यासाठी व त्या गुन्ह्यात अटकेत असलेले आशिलाचे वडील यांच्या जामीन अर्जावर से देण्यासाठी स्वतःसाठी दोन लाखाच्या प्राथमिक लाच मागणीमध्ये अचानकपणे वाढ करून दोन कोटी रुपयांची लाच मागितली व त्यापैकी एक कोट स्वतःसाठी व त्यांच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना एक कोटी असे दोन कोटी रुपयांची लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
तसेच आलोसे यांनी तक्रारदाराकडे वरील कारणासाठी मागितलेल्या दोन कोटी रुपयांच्या लाच रकमेपैकी 50 लाख स्र्पयांचा पहिला हप्ता लवकर देऊन उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने देण्याचे ठरल्याचे निष्पन्न झाले. लवकरात
वरील प्रमाणे लाच मागणी पडताळणी केल्यानंतर आज दि. 2/11/2025 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाई दरम्यान यातील आरोपी लोकसेवक प्रमोद चिंतामणी (वय 35 वर्ष, पोलीस उप निरीक्षक, नेमणूक – आर्थिक गुन्हे शाखा, पिंपरी चिंचवड आयुक्तालय) यांने उंटाड्या मारुती मंदिरासमोर पुणे शहर येथे तक्रारदाराकडून लाच मागणी पडताळणी कारवाईदरम्यान मागितलेल्या दोन कोटी रकमेतील 50 लाखाच्या पहिला हप्ता रक्कमेपैकी 46 लाख 50 लाख रुपयांची लाच तक्रारदाराकडून स्वीकारली असता त्यास प्रसाद लोणारे (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.पुणे) यांच्या पथकाने रंगेहात पकडले असून त्याच्याविस्द्ध पुण्यातील समर्थ पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. पुढील तपास अविनाश घरबुडे, (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि पुणे) he करीत आहेत.







