पुणे : रिक्षा चालकाकडून दर महिन्याला 500 रुपये लाच घेणाऱ्या महिला ट्रॅफिक पोलीस आणि वार्डन ला लाचलूचपत विभागाने रंगेहात पकडले आहे. श्रीमती वर्षा विठ्ठल कांबळे (वय – 35, पिंपरी वाहतूक विभाग, पिंपरी चिंचवड आयुक्तालय, राठी. लिंक रोड बौद्ध नगर, पिंपरी, पुणे (वर्ग – 3) व कृष्णा मछिंद्र गव्हाणे (वय 28 वर्ष ट्रफिक वार्डन, राठी.आळंदी वडगांव रोड, राम मंदिरच्या समोर. आळंदी) अशी या दोन लोकसेवक आरोपिंची नावे आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, यातील तक्रारदार हे व्यवसायाने रिक्षा चालक असून त्यांच्याकडे स्वतःची रिक्षा आहे. तक्रारदार हे मोरवाडी चौक, KSB चौक, पिंपरी, कुदळवाडी या परिसरात रिक्षा चालवीण्याचा व्यवसाय करतात. दि.17/111/2025 रोजी तक्रारदार हे त्यांच्या रिक्षामधून प्रवासी वाहतूक करीत असताना आलोसे महिला पोलीस शिपाई श्रीमती वर्षा कांबळे व ट्रॅफिक वॉर्डन कृष्णा गव्हाणे यांनी तक्रारदाराची रिक्षा थांबवली तेव्हा श्रीमती वर्षा कांबळे व वार्डन गव्हाणे यांनी तक्रारदार यांचेकडे त्यांच्या रिक्षावर जादा प्रवासी वाहतूक या सदराखाली कारवाई न करण्यासाठी 300 रुपये घेतले.
त्यानंतर दि. 26/11/2025 रोजी तक्रारदार K.SB. पिंपरी चौकातुन त्यांची रिक्षा घेऊन जात असताना म.पो.शि श्रीमती वर्षा कांबळे व ट्रॅफिक वार्डन गव्हाणे यांनी परत तक्रारदार’ यांची रिक्षा अडवली व त्यांनी तक्रारदारस तू नेहमीच या परिसरात जादा प्रवासी वाहतूक करीत असतो तूझ्या रिक्षावर जादा प्रवासी वाहतूक करत असल्याबाबतची कारवाई करायची नसल्यास प्रत्येक महिन्याला आम्हाला हफ्ता म्हणून 500 रुपये द्यावे लागतील असे बोलून 500 रुपयांच्या लाचेची मागणी केली. याबाबतची तक्रार तक्रारदार यांनी त्याच दिवशी लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे येथे दिली.
सदर तक्रारीच्या अनुषंगाने श्रीमती आसावरी शडगे, (पोलीस निरीक्षक, ला.प्र.वि.पुणे) यांच्या पथकाने 29/11/2025 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता ट्रॅफिक वार्डन गव्हाणे यांनी पडताळणी कारवाई दरम्यान तक्रारदार यांच्या रिक्षावर जादा प्रवासी वाहतुक कारवाई न करण्यासाठी स्वतःसाठी आणि महिला पोलीस शिपाई श्रीमती वर्षा कांबळे यांच्यासाठी त्यांच्या समक्ष तडजोडीअंती प्रत्येक महिण्यासाठी हफ्ता म्हणून 400 रुपये लाचेची मागणी केल्याचे व त्यानंतर ती स्विकारल्याचे सापळा कारवाईत निष्पन्न झाले आहे.
वरील दोन्ही लोकसेवक आरोपिंविरुद्ध संत तुकाराम नगर पोलीस स्टेशनमध्ये भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 नुसार गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. तपास अधिकारी श्रीमती निता मिसाळ (सहा.पोलीस आयुक्त ला.प्र.वि.पुणे) या काम पाहत आहेत.







